पोको एफ १ ची आर्मर्ड आवृत्ती येणार नवीन स्वरूपात

0

शाओमीची मालकी असणार्‍या पोकोच्या पोको एफ १ या स्मार्टफोनची आर्मर्ड एडिशन आता नवीन स्वरूपात सादर करण्यात येणार आहे.

पोको एफ १ हा स्मार्टफोन तीन व्हेरियंटच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्यात लाँच करण्यात आला होता. यानंतर याला आर्मर्ड एडिशनच्या माध्यमातून (८ जीबी रॅम+२५६ जीबी स्टोअरेज) सादर करण्यात आले होते. आता याच आर्मर्ड एडिशनला नवीन स्वरूपात उपलब्ध करण्यात येणार आहे. याला ६ जीबी रॅम+६४ जीबी स्टोअरेज आणि ६ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोअरेज अशा दोन पर्यायांमध्ये सादर करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. यांचे मूल्य अनुक्रमे २०,९९९ आणि २३,९९९ रूपये असेल.

पोको एफ १ आर्मर्ड आवृत्तीच्या या दोन नवीन मॉडेलमध्ये ६.१ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यावर २.५ डी वक्राकार ग्लासचे आवरण असून कॉर्निंग गोरीला ग्लास ३ चे संरक्षक आवरणदेखील आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८४५ हा गतीमान प्रोसेसर देण्यात आलेला आहे. वर नमूद केल्यानुसार याचे दोन व्हेरियंट असणार आहेत. याच्या मागील बाजूस १२ मेगापिक्सल आणि ५ मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. तर यातील फ्रंट कॅमेरा हा २० मेगापिक्सल्स क्षमतेचा आहे. यामध्ये ब्युटिफाय फिचर दिलेले आहे. याच्याच मदतीने यातील फेस अनलॉक हे फिचर काम करणार आहे. यामध्ये ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ८.१ ओरियो आवृत्तीपासून विकसित करण्यात आलेल्या मीयुआय ९.६ या प्रणालीवर चालणारा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here