बोट स्टोन २३० मिनी ब्ल्यु-टुथ स्पीकर सादर

0

बोट कंपनीने स्टोन २३० हा मिनी ब्ल्यु-टुथ स्पीकर भारतीय बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली आहे.

ब्ल्यु-टुथ तंत्रज्ञानाच्या मदतीने वायरलेस कनेक्टीव्हिटी असणारे स्पीकर भारतात खूप लोकप्रिय झाले आहेत. यामुळे बाजारपेठेत नवनवीन मॉडेल्स लाँच करण्यात येत आहेत. या अनुषंगाने बोट हा कंपनीने स्टोन २३० हे मॉडेल सादर केले आहे. हा गोलाकार आकाराचा मिनी या प्रकारातील स्पीकर आहे. याचा आकार अतिशय आटोपशीर असून याला पकडण्यासाठी दोरीची सुविधाही केली आहे. चारकोल ब्ल्यू आणि मिडनाईट ब्ल्यू या दोन रंगाच्या पर्यायांमध्ये हे मॉडेल १,२४९ रूपये मूल्यात ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे. याला ग्राहक अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करू शकतात.

बोस्ट स्टोन २३० या मॉडेलची ध्वनी क्षमता ३ वॅट इतकी आहे. यामध्ये १२०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून ती एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल १० दिवसांचा बॅकअप देणार असल्याचा दावा कंपनीतर्फे करण्यात आला आहे. ब्ल्यु-टुथ तंत्रज्ञानाच्या मदतीने हा स्पीकर स्मार्टफोन, टॅबलेट आदींसह अन्य स्मार्ट उपकरणांना कनेक्ट करता येणार आहे. यात मायक्रो-एसडी कार्डचा स्लॉट असल्यामुळे याला स्वतंत्र स्पीकर म्हणूनही वापरता येणार आहे. तसेच यामध्ये मायक्रो-युएसबी पोर्ट, मल्टी फंक्शनल बटन्स देण्यात आलेले आहेत. यात जेएलएसी६९०५बी ही स्वतंत्र चीप प्रदान करण्यात आली असून याच्या मदतीने इमर्सीव्ह या प्रकारातील ध्वनीची अनुभूती घेता येणार आहे. बोट कंपनीने अलीकडेच स्पीनएक्स हे मॉडेल लाँच केले होते. याच्या पाठोपाठ बोस्ट स्टोन २३० हा स्पीकर लाँच करण्यात आलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here