असुसच्या झेनफोन मॅक्स प्रो एम२ स्मार्टफोनची नवीन आवृत्ती

0

असुसने आपल्या झेनफोन मॅक्स प्रो एम२ या स्मार्टफोनची टिटॅनियम एडिशन ही नवीन आवृत्ती भारतीय ग्राहकांसाठी सादर केली आहे.

असुसने झेनफोन मॅक्स प्रो एम२ हे मॉडेल ब्ल्यू या रंगाच्या पर्यायात आधी सादर केले आहे. आता हेच मॉडेल टिटॅनियम एडिशनच्या माध्यमातून पुन्हा एकदा नव्याने सादर करण्यात आले आहे. याला फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून उपलब्ध करण्यात आले आहे.

असुस झेनफोन मॅक्स एम२ या मॉडेलमध्ये ६.३ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस म्हणजे १५२० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आलेला आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ६३२ हा प्रोसेसर दिलेला आहे. वर नमूद केल्यानुसार याचे दोन व्हेरियंट असून या दोन्हींमध्ये मायक्रो-एसडी कार्डचा सपोर्ट असल्यामुळे स्टोअरेज वाढविता येणार आहे. याच्या मागील बाजूस १३ आणि २ मेगापिक्सल्सचा ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर यातील फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा असणार आहे. यामध्ये ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरियो ८.१ या प्रणालीवर चालणारे असेल.

याचे ३ जीबी रॅम+३२ जीबी स्टोअरेजचे व्हेरियंटचे मूल्य १२,९९९; ४ जीबी रॅम+६४ जीबी स्टोअरेच्या व्हेरियंटचे मूल्य १४,९९९ तर ६ जीबी रॅम+६४ जीबी स्टोअरेजयुक्त व्हेरियंटचे मूल्य १६,९९९ रूपये इतके आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here