अ‍ॅस्ट्रमचा वायरलेस बॅरल स्पीकर

0

अ‍ॅस्ट्रम कंपनीने भारतीय बाजारपेठेत एसटी ४०० हा वायरलेस स्पीकर सादर केला असून याचे मूल्य ७,४९० रूपये आहे.

ध्वनी उपकरणांच्या क्षेत्रात कार्यरत असणार्‍या अ‍ॅस्ट्रम कंपनीने एसटी ४०० हे नवीन मॉडेल भारतीय ग्राहकांसाठी सादर केले आहे. याला अमेझॉन इंडियासह ऑफलाईन प्रकारामध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. नावातच नमूद असल्यानुसार हे मॉडेल बॅरलप्रमाणे दिसणारे आहे. याच्या वर हँडल प्रदान करण्यात आले आहे. यामुळे याला ट्रॉलीप्रमाणे कोठेही सहजपणे नेता येणार आहे. परिणामी, बाहेर आयोजीत करण्यात येणारे विविध कार्यक्रम, लहान-मोठ्या पार्ट्या आदींसाठी हे स्पीकर अतिशय उपयुक्त ठरणार आहेत. यात अतिशय दर्जेदार असे वुफर देण्यात आलेले आहे. याची एकूण क्षमता २५ वॅट आरएमएस इतकी असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.

या वायरलेस स्पीकरला अतिशय आकर्षक असा लूक मिळालेला आहे. कनेक्टीव्हिटीसाठी यामध्ये ब्ल्यु-टुथ, एसडी कार्ड आणि युएसबी आदी पर्याय देण्यात आले आहेत. यात इन-बिल्ट एफएम रेडिओ दिलेला आहे. यातील ३००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर सहा तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. या मॉडेलमध्ये इनबिल्ट मायक्रोफोन दिलेला असून एलईडीच्या माध्यमातून विविध फंक्शन्सचे स्टेटस पाहता येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here