अ‍ॅपल म्युझिकच्या दरांमध्ये कपात

0

अ‍ॅपल म्युझिक या ऑनलाईन स्ट्रीमिंग सेवेच्या दरात कपात करण्यात आली असून नवे किफायतशीर दर जाहीर करण्यात आले आहे.

अ‍ॅपलने गत वर्षी अ‍ॅपल म्युझिक या नावाने ऑनलाईन म्युझीक स्ट्रीमिंग सेवा सुरू केली आहे. याआधी अनेक देशी-विदेशी कंपन्या या क्षेत्रात होत्या. तर अलीकडेच स्पॉटीफाय या ख्यातप्राप्त कंपनीने भारतात प्रवेश केला असून युट्युब म्युझिक ही सेवादेखील सुरू झाली आहे. अर्थात आता म्युझिक स्ट्रीमिंगमधील स्पर्धा आता अतिशय चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या पार्श्‍वभूमिवर, अ‍ॅपल म्युझिकच्या सबस्क्रीप्शन रेटमध्ये कपात करण्यात आली आहे.

अ‍ॅपल म्युझिकसाठी आता दरमहा ९९ रूपये मोजावे लागणार आहे. आधी हाच दर १२० रूपये प्रति-महिना इतका होता. तर हाच प्लॅन वार्षिक स्वरूपात घ्यावयाचा असल्यास १२०० ऐवजी ९०० रूपयांची आकारणी करण्यात येणार आहे. यासोबत अ‍ॅपलच्या फॅमिली पॅकमध्येही कपात करण्यात आली आहे. आधी याला १९० रूपये प्रति-महिन लागत होता. तर आता याला १४९ रूपये महिला लागणार असून यामध्ये एकाच कुटुंबातील सहा जण सेवा वापरू शकणार आहेत. तसेच स्टुडंट प्लॅनसाठी आधी ६० रूपये महिना लागत होता. तर याला आता ४९ रूपये महिना लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here