जीमेलमध्ये एएमपी सपोर्ट : डायनॅमिक ई-मेल्ससाठी होणार वापर

0

गुगलने जीमेलमध्ये एएमपी तंत्रज्ञानाचा सपोर्ट दिला असून यामुळे युजर्सला डायनॅमिक ई-मेल्सचे व्यवस्थापन अधिक सुलभ होणार आहे.

कधी काळी फक्त संदेश वहनासाठी वापरल्या जाणार्‍या ई-मेलमध्ये अलीकडच्या काळात लक्षणीय बदल झाला आहे. अर्थात जगात सर्वाधीक लोकप्रिय असणार्‍या जीमेलमध्येही या बदलांचा स्वीकार सर्वप्रथम करण्यात आला आहे. यातच आता या सेवेसाठी एएमपी म्हणजेच अ‍ॅक्सलरेटेड मोबाईल पेजेस या तंत्रज्ञानाचा सपोर्ट देण्यात आला आहे. याचा सर्वात जास्त वापर हा डायनॅमिक मेल्सच्या व्यवस्थापनासाठी होणार आहे. आजवर आपण स्टॅटिक मेल पाठवत होतो. आता मात्र डायनॅमिक प्रकारातील मेल्स पाठविता येणार आहे. याच्या अंतर्गत विविध कंपन्यांना इंटरअ‍ॅक्टीव्ह पध्दतीत ई-मेल वापरता येईल. याच्या पहिल्या टप्प्यात ओयो, रेडबस, बुकींग.कॉम, पिंटरेस्ट आदी कंपन्या आपल्या ग्राहकांना विविध प्रॉडक्टचे कॅटलॉग असणारे मेल्स पाठवू शकतील. तर ग्राहकदेखील संबंधीत कंपनीची साईट अथवा अ‍ॅपवर रिडायरेक्ट न होता तेथेच याला उत्तर देऊ शकतो. ग्राहकाच्या दृष्टीने डायनॅमिक प्रकारातील मेल्सला तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी एएमपी तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे.

जीमेलच्या वेब युजर्सला एएमपी सपोर्ट देण्यात आला असून स्मार्टफोनच्या अँड्रॉइड व आयओएस अ‍ॅप्सवरही याला लवकरच सादर करण्यात येणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे याहू व आऊटलुकसारख्या अन्य ई-मेल सेवा पुरवठादारही आपल्या ग्राहकांनी एएमपी सपोर्ट लवकरच देणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here