एयरटेल बुक्स सेवेस प्रारंभ

0

एयरटेल बुक्स या डिजीटल बुक सर्व्हीसला प्रारंभ करण्यात आला असून याला अँड्रॉइड व आयओएस युजर्ससाठी सादर करण्यात आले आहे.

एयरटेलने आपल्या एयरटेल बुक्स या सेवेस प्रारंभ केला आहे. नावातच नमूद असल्यानुसार ही ई-बुक्स सबस्क्रीप्शन सेवा आहे. याच्या अंतर्गत युजर्सला विविध विषयांवरील ई-बुक्स उपलब्ध करण्यात आलेली आहेत. एका स्वतंत्र अ‍ॅपच्या माध्यमातून याला वापरता येणार असून हे अ‍ॅप अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालींसाठी सादर करण्यात आले आहे. यामध्ये सध्या हिंदी आणि इंग्रजीतील सुमारे ७० हजार ई-बुक्सचा समावेश करण्यात आला आहे. यात अजून भर पडणार आहे. विशेष म्हणजे मराठीसह अन्य भारतीय भाषांमधील पुस्तकेदेखील यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

एयरटेल बुक्स सेवेसाठी ग्राहकाला सहा महिन्यांसाठी १२९ तर वर्षभरासाठी १९९ रूपये अदा करावे लागणार आहेत. युजरला एक महिन्यासाठी मोफत सेवा वापरता येणार आहे. एयरटेलने आपली ही सेवा सादर करण्यासाठी जगरनेट बुक्स या ख्यातप्राप्त कंपनीसोबत सहकार्याचा करार केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here