८८ इंच आकारमानाचा आणि ८ के क्षमतेचा टिव्ही !

0

एलजी कंपनीने तब्बल ८८ इंच आकारमानाचा आणि ८ के क्षमता असणारा ओएलईडी टिव्ही सादर केला आहे.

गत वर्षात फोर-के आणि एचडीआर हे तंत्रज्ञान टिव्हीच्या क्षेत्रात बर्‍यापैकी प्रचलीत झाले. आता २०१८च्या प्रारंभी तंत्रज्ञान याच्या पुढे झेप घेणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. याची चुणूक एलजी कंपनीने सादर केलेल्या नव्या मॉडेलमधून दिसून येत आहे. वर नमूद केल्यानुसार या टिव्हीतील डिस्प्ले हा ८८ इंच आकाराचा असेल. आजवर ७७ इंच आकारमानाचे आणि फोर-के क्षमतेची टिव्ही बाजारपेठेत उपलब्ध करण्यात आले आहेत. मात्र एलजीने आपल्या नवीन मॉडेलच्या माध्यमातून नवा विक्रम केल्याचे दिसून येत आहे. याचा डिस्प्ले ऑर्गेनिक एलईडी म्हणजेच ओएलईडी या प्रकारातील आहे. हा टिव्ही नेमक्या किती मूल्यात आणि कोणत्या देशांमध्ये मिळेल याची माहिती आगामी सीईएस-२०१८ मध्ये जाहीर करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here