६ जीबी रॅम आणि ड्युअल कॅमेर्‍यांनी सज्ज ऑनर १० !

0
ऑनर १०, honor 10

हुआवेची मालकी असणार्‍या ऑनर कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपला ऑनर १० हा उच्च श्रेणीतील स्मार्टफोन लाँच केला असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ऑनर १० या स्मार्टफोनच्या लाँचींगबाबत उत्सुकतेचे वातावरण होते. गत महिन्यात याला चीनमध्ये लाँच करण्यात आले असले तरी भारतासह अन्य राष्ट्रांमध्ये याला सादर करण्यात आलेले नव्हते. या पार्श्‍वभूमिवर, लंडन शहरातील एका कार्यक्रमात याला जागतिक बाजारपेठेत उतारण्यात आले. यासोबत हे मॉडेल भारतातही लाँच करण्यात आले आहे. आजपासून हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे. याला मिडनाईट ब्लॅक आणि फँडम ब्ल्यू या दोन रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. याचे मूल्य ३२,९९९ रूपये असून यासोबत कंपनीने काही ऑफर्सदेखील सादर केल्या आहेत. याच्या अंतर्गत ऑनरच्या जुन्या स्मार्टफोन्ससाठी एक्सचेंज ऑफर दिलेली आहे. अ‍ॅक्सीस कार्डवरून हा स्मार्टफोन खरेदी केल्यास १० टक्क्यांचा डिस्काऊंट मिळणार आहे. तर जिओने यासोबत १२०० रूपयांचा कॅशबॅक, १०० जीबी मोफत डाटा आणि आपल्या पार्टनर्सच्या ३,३०० रूपयांच्या व्हाऊचर्सची ऑफर दिली आहे.

ऑनर १० या स्मार्टफोनमध्ये ५.८४ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस म्हणजेच २२८० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा फुल व्ह्यू या प्रकारातील तसेच १९:९ असा अस्पेक्ट रेशो असणारा डिस्प्ले देण्यात आला आहे. या मॉडेलचे बॉडी-टू-स्क्रीन हे गुणोत्तर ८६.२ टक्के आहे. यामध्ये अतिशय गतीमान असा ऑक्टा-कोअर हायसिलीकॉन किरीन ९७० हा प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ६ जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविता येणार आहे. याच्या मागील बाजूस २४ आणि १६ मेगापिक्सल्स क्षमतांच्या ड्युअल कॅमेर्‍यांचा सेटअप देण्यात आला आहे. यात कृत्रीम बुध्दीमत्तेचा वापर करून अगदी रिअल टाईम या प्रकारात दृश्य आणि व्यक्तींना ओळखण्याची प्रणाली देण्यात आली आहे. यात थ्री-डी प्रोर्ट्रेट लायटींग आणि एचडीआर आदी फिचर्सचाही समावेश आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात २४ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असून यातही कृत्रीम बुध्दीमत्ता आणि थ्री-डी पोर्ट्रेट लायटींग हे फिचर्स दिलेले आहेत. यात ७.१ मल्टी चॅनल हाय-फाय ऑडिओ चीप देण्यात आलेली असून यामुळे अतिशय सुश्राव्य अशा ध्वनीची अनुभूती घेता येत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यामध्ये ३४०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आलेली आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड ओरियो ८.१ या प्रणालीपासून विकसित करण्यात आलेल्या एमआयुआय ८.१ या सिस्टीमवर चालणारा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here