१६ लेन्सचा कॅमेरा बाजारपेठेत दाखल

0

एक वा दोन नव्हे तर तब्बल १६ लेन्स, ५२ मेगापिक्सल्स क्षमता आणि ५ एक्स झूम असणारा एल-१६ हा कॅमेरा आता बाजारपेठेत दाखल झाला आहे.

भारतीय वंशाचे राजीव लरोजा हे सहसंस्थापक असणार्‍या लाईट या स्टार्टपने चार वर्षांच्या अथक परिश्रमानंतर एल-१६ हा कॅमेरा विकसित केला आहे. या मॉडेलविषयी पहिल्यांदा २०१५ साली प्राथमिक माहिती देण्यात आली होती. तर या वर्षाच्या एप्रिल महिन्यात संबंधीत कॅमेर्‍याच्या छायाचित्रांसह सर्व फिचर्स जगासमोर अधिकृतपणे मांडण्यात आले होते. यात १६ लेन्सेस देण्यात आलेले आहेत. यात एकाच वेळी सर्व लेन्सेसच्या मदतीने तब्बल ५२ मेगापिक्सल्स इतक्या क्षमतेचे छायाचित्र काढता येते. सॉप्टवेअरच्या मदतीने ही सर्व छायाचित्रे सलंग्न करून एकच मुख्य प्रतिमा निर्मित केली जाते. यासाठी कॅमेर्‍यातील अलगॉरिदमचा वापर केला जातो. एकचदा अनेक लेन्स कार्यरत असल्याने याच्या मदतीने अगदी अंधारातही उत्तम दर्जाचे छायाचित्र घेता येते. लक्षणीय बाब म्हणजे यात ५ एक्स ऑप्टीकल झूमदेखील प्रदान करण्यात आला आहे. याच्या मदतीने दुरचे छायाचित्रही अधिक स्पष्टपणे घेता येते. हा कॅमेरा अँड्रॉइड प्रणालीवर चालणार्या स्मार्टफोनशी कनेक्ट करणे शक्य आहे. तर याच्या अ‍ॅपच्या मदतीने याद्वारे काढलेली छायाचित्रे हे सोशल मीडियात शेअर करता येतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here