होमपॉडला थंड प्रतिसाद; उत्पादनात कपात

0

अ‍ॅपल कंपनीच्या होमपॉड या स्मार्ट स्पीकरला अपेक्षित प्रतिसाद न लाभल्यामुळे याच्या उत्पादनात कपात करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे.

अ‍ॅपल कंपनीने ज्या क्षेत्रात पदार्पण केले तेथे यश मिळवले. अलीकडच्या काही वर्षांमध्ये सुपरहिट ठरलेले आयफोन, आयपॅड आदी उपकरणे याची ग्वाही देणारे आहेत. तथापि, अ‍ॅपलचे अत्यंत महत्वाकांक्षी असे होमपॅड हे मॉडेल मात्र कंपनीच्या अपेक्षांवर खरे उतरले नसल्याचे दिसून येत आहे. अमेझॉनची इको तर गुगलच्या होम या मालिकांना आव्हान देण्यासाठी अ‍ॅपलने होमपॅड या व्हाईस कमांडवर चालणारा स्मार्ट स्पीकर काही महिन्यांपूर्वी बाजारपेठेत सादर केले तेव्हा हे प्रॉडक्ट धमाल करणार असल्याचे मानले जात होते. विशेष करून स्मार्टफोनवरील व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंटमध्ये अ‍ॅपलचा सिरी हा इतरांच्या तुलनेत अत्यंत लोकप्रिय व कार्यक्षम असल्याचे आधीच सिध्द झाले आहे. यामुळे याच सिरीचा समावेश असणारा होमपॉड हा स्मार्ट स्पीकरदेखील तितकाच लोकप्रिय होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तथापि, प्रत्यक्षात मात्र याला बाजारपेठेतून अतिशय थंड प्रतिसाद लाभला. यामुळे अ‍ॅपलने याच्या उत्पादनात घट केल्याची माहिती ब्लूमबर्ग आणि चायना टाईम्स या वृत्तसंस्थांनी दिली आहे.

विश्‍वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार देण्यात आलेल्या या वृत्तात आधी दरमहा ५ लाख होमपॉड उपकरणे तयार होत होती. आता मात्र अ‍ॅपलने महिन्याला फक्त २ लाख होमपॉड उत्पादीत करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे हे उपकरण फ्लॉप ठरल्याची चर्चा टेकविश्‍वात सुरू झाली आहे. येत्या काही महिन्यांमध्ये होमपॉडमध्ये अनेक बदल करून याला नवीन स्वरूपात सादर करण्याची शक्यतादेखील आता व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here