हे अ‍ॅप तुम्हाला करेल मालामाल !

0

रोख पारितोषिकांसाठी ख्यात असणारे एचक्यू ट्रिव्हिया हे प्रश्‍नमंजुषा या प्रकारातील अ‍ॅप आता अँड्रॉइड युजर्सलाही वापरता येणार आहे.

एचक्यू ट्रिव्हिया हे अ‍ॅप आजवर फक्त आयओएस या प्रणालीच्या युजर्सला वापरता येत होते. हे प्रश्‍नमंजुषा या प्रकारातील अ‍ॅप आहे. खर तर या प्रकारात अक्षरश: शेकडो अ‍ॅप्स उपलब्ध असले तरी यातील काही बाबी या युजर्सला भावणार्‍या ठरल्या आहेत. इंटरमीडिया लॅब्जने एचक्यू ट्रिव्हिया हे अ‍ॅप विकसित केले आहे. याच्या युजर्सला दररोज सायंकाळी ६ तर रविवारी दुपारी १२ वाजता १२ प्रश्‍न विचारले जातात. यातील सर्व अचूक प्रश्‍नांची उत्तरे देणार्‍याला १,००० डॉलर्सचे पारितोषिक दिले जाते. अलीकडेच ही रक्कम २,००० डॉलर्स इतकी करण्यात आली आहे. तर अनेकदा अन्य वेळेसह विविध रकमांच्या पारितोषिकांसह प्रश्‍न विचारले जातात. एकापेक्षा जास्त युजर्सनी अचूक उत्तरे दिल्यास ही रक्कम त्यांच्यात विभाजीत करण्यात येते. यात मल्टी-प्लेअर या प्रकारात खेळण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे. आयओएसवर या अ‍ॅपला युजर्सचा उत्तम प्रतिसाद लाभला होता. या पार्श्‍वभूमिवर हे अ‍ॅप आता अँड्रॉइड प्रणालीच्या युजर्ससाठी सादर करण्यात आले आहे. सध्या गुगल प्ले स्टोअरवर याची पूर्व नोंदणी सुरू झाली आहे. येत्या काही दिवसात हे अ‍ॅप नोंदणी करणार्‍या युजर्सला प्रत्यक्षात वापरता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here