हुआवे वॉच २ (२०१८) : जाणून घ्या सर्व फिचर्स

0

हुआवे कंपनीने आपल्या वॉच २ (२०१८) या मॉडेलचे अनावरण केले असून यात ई-सीमकार्डसह व्हाईस कॉलींगची सुविधा देण्यात आली आहे.

हुआवे वॉच २ (२०१८) हे मॉडेल आधी बाजारपेठेत उतारण्यात आलेल्या वॉच २ या मॉडेलची अद्ययावत आवृत्ती आहे. याला स्टँडर्ड ब्ल्यु-टुथ व्हेरियंट, फोर-जी नॅनो सीम आणि ई-सीम या तीन प्रकारांमध्ये बाजारपेठेत उतारण्याची घोषणा करण्यात आली आहे. याच्या मदतीने युजर कॉल करू शकणार आहे. याशिवाय संदेशांची देवाण-घेवाणदेखील करता येणार असून विविध अ‍ॅप्सचा वापरदेखील करता येणार आहे. हे मॉडेल अँड्रॉइड वेअर २.० या प्रणालीवर चालणारे असेल. यामध्ये १.२ इंच आकारमानाचा गोलाकार डिस्प्ले असून यावर कॉर्नींग गोरीला ग्लास ३ चे संरक्षक आवरण देण्यात आले आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन वेअर २१०० हा प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम ७८६ एमबी तर इनबिल्ट स्टोअरेज ४ जीबी इतके आहे.

हुआवे वॉच २ (२०१८) या मॉडेलमध्ये फास्ट चार्जींगसह ४२० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तर कनेक्टीव्हिटीसाठी यामध्ये ब्ल्यु-टुथ, जीपीएस, वाय-फाय, एनएफसी आदी पर्याय देण्यात आले आहेत. तसेच यामध्ये हार्ट रेट सेन्सरसह गायरोस्कोप, कंपास, बॅरोमीटर, अँबियंट लाईट सेन्सर आदी सेन्सर्सदेखील असतील. सर्वात महत्वाची बाब म्हणजे हे स्मार्टवॉच वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ असल्यामुळे कोणत्याही वातावरणात वापरणे शक्य आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here