हुआवे आणणार घडी होणारा स्मार्टफोन

0

हुआवे कंपनीला घडी होणार्‍या स्मार्टफोनचे पेटंट मिळाले असून यामुळे आता ही कंपनी याच प्रकारातील स्मार्टफोन सादर करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हुआवे या चीनी कंपनीला घडी होणार्‍या स्मार्टफोनचे पेटंट मिळाले आहे. यामुळे जागतिक पातळीवर तिसर्‍या क्रमांकाची स्मार्टफोन कंपनी म्हणून लौकीक असणारी हुआवे यात आघाडी घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या या पेटंटच्या माहितीनुसार हुआवेच्या आगामी स्मार्टफोनमध्ये दोन डिस्प्ले असतील. बंद केल्यानंतर याला एका डिस्प्लेवरून स्मार्टफोन म्हणून वापरता येईल. तर याला उघडले असता मोठा डिस्प्ले तयार होऊन याचा टॅबलेट म्हणून वापर करता येईल. अर्थात टॅबलेट आणि स्मार्टफोन या दोन्ही प्रकारांमध्ये वापरण्याजोगा स्मार्टफोन हुआवे कंपनी लवकरच सादर करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here