हायरचे डायरेक्ट कुल तंत्रज्ञानाने युक्त रेफ्रिजरेटर्स

0

हायर कंपनीने डायरेक्ट कुल या तंत्रज्ञानाने युक्त असणारे रेफ्रिजरेटर्स भारतीय ग्राहकांसाठी सादर केले असून त्याला अन्य मॉडेल्सच्या तुलनेत कमी वीज लागत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

सध्या कडाक्याच्या उन्हाळ्यात विविध रेफ्रिजरेटर्स उत्पादकांनी ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी नवनवीन मॉडेल्स लाँच करण्यावर भर दिला आहे. या पार्श्‍वभूमिवर हायर अप्लायन्सेस इंडिया या कंपनीने बाजारपेठेत रेफ्रिजरेटर्स मॉडेल्सची नवीन मालिका सादर केली आहे. यातील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे डायरेक्ट कुल (डीसी) हे तंत्रज्ञान होय. याच्या अंतर्गत अतिशय उच्च दर्जाच्या काँप्रेसरचा समावेश करण्यात आला आहे. याच्या मदतीने अतिशय कमी वेळात शीतकरण शक्य होत असल्याचे हायरने नमूद केले आहे. विशेष बाब म्हणजे यासाठी अतिशय कमी वीज लागते. दिवसाला अवघ्या ०.३५ युनिटमध्ये हे रेफ्रिजरेटर्स चालत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. म्हणजेच दाने सीएफएल बल्बला लागणार्‍या वीजेत हायरचे हे फ्रिज चालू शकते. यामुळे याला उर्जा वापराबाबत पंचतारांकीत मानांकनदेखील मिळाले आहे.

हायरच्या या रेफ्रिजरेटर्स मध्ये एका तासाच बर्फाचे खडे बनविण्याची सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये अतिशय सुरक्षित अशा इन्सुलेशनने युक्त असणारी वायरींग करण्यात आल्यामुळे ते वापरण्यास सुरक्षित आहे. तर यात दर्जेदार कंडेनसर वापरण्यात आले आहे. याच्या जोडीला यामध्ये सीएफसी म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन हा वायू शीतकरणासाठी वापरण्यात येत असून तो पर्यावरण आणि युजर्ससाठी हानीकारक नाहीय. महत्वाचे म्हणजे हे रेफ्रिजरेटर्स विना स्टॅबिलायझरनेही वापरता येतात. याच्या विविध मॉडेल्सचे मूल्य १९,०५० ते २३,०५० रूपयांच्या दरम्यान असून कंपनीच्या देशभरातील शोरूम्समधून ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here