हनीवेलचे स्मार्ट एयर प्युरिफायर

0

हनीवेल कंपनीने एयर टच एस या नावाने भारतीय ग्राहकांसाठी स्मार्ट एयर प्युरिफायर उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे.

सर्व उपकरणे स्मार्ट होत असतांना आता वायू शुध्दीकरण उपकरण अर्थात एयर प्युरिफायरदेखील याच प्रकारे अत्याधुनिक बनले आहे. हनीटच एयर टच एस या मॉडेलमध्ये एयर प्युरिफायरसोबत काही स्मार्ट फिचर्स देण्यात आले आहेत. यात वाय-फायच्या मदतीने युजर आपला स्मार्टफोन या उपकरणाशी कनेक्ट करू शकेल. यानंतर हनीवेलच्या एचप्लस या अ‍ॅपच्या मदतीने या एयर प्युरिफायरचे विविध फंक्शन्स ऑपरेट करता येतील. हे अ‍ॅप अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालींसाठी सादर करण्यात आले असून याच्या मदतीने रिअल टाईम या पध्दतीने हवेच्या शुध्दतेच्या प्रमाणावर लक्ष ठेवता येईल. यात शेड्युलिंगची सुविधादेखील असल्यामुळे कुणीही युजर दुरून आपले उपकरण हव्या त्या वेळेस चालू-बंद करू शकतो. यात ११ हेपा फिल्टर प्रदान करण्यात आले आहे. याच्या मदतीने ०.३ मायक्रोमीटर इतक्या वा त्यापेक्षा जास्त आकारमानाच्या घातक कणांना अटकाव करण्यात येतो. यात आरोग्यासाठी अतिशय धोकेदायक मानल्या गेलेल्या पीएम२.५ या पार्टीकल्सचाही समावेश आहे. यात खास हनीवेलने विकसित केलेले हायसिव्ह हे फिल्टरदेखील देण्यात आले असून यामुळे परिसरातील घातक वायू, वाफ तसेच अन्य वायूंपासून संरक्षण होते. या एयर प्युरिफायरच्या मदतीने ४५० चौरस फुटांपर्यंतच्या परिसरात शुध्द वायूचा पुरवठा होत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. हनीवेल कंपनीने एयर टच एस स्मार्ट एयर प्युरिफायर हे मॉडेल ३९,९९० रूपये मूल्यात अमेझॉन इंडियासह देशभरातील क्रोमा स्टोअर्समधून ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here