स्वाईप स्मार्टफोनसोबत मिळणार व्हिआर हेडसेट

0

स्वाईप कंपनीने आपले एलीट व्हिआर कनेक्ट हे मॉडेल ४,४४९ रूपये मूल्यात भारतीय बाजारपेठेत उपलब्ध केले असून यासोबत व्हिआर हेडसेट देण्यात येत आहे.

स्वाईप एलीट व्हिआर कनेक्ट या मॉडेलसोबत एक व्हिआर हेडसेटदेखील प्रदान करण्यात आला आहे. हे मॉडेल ग्राहकांना शॉपक्लुज या संकेतस्थळावरून उपलब्ध करण्यात आले आहे. या स्मार्टफोनमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि ७२० बाय १२८० पिक्सल्स म्हणजेच एचडी क्षमतेचा डिस्प्ले असेल. यात मीडियाटेक एमटी ६७३७ हा प्रोसेसर असून याची रॅम एक जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज आठ जीबी आहे. हे स्टोअरेज मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबीपर्यंत वाढविता येणार आहे. या स्मार्टफोनमध्ये ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून हे मॉडेल ब्लॅक, ग्रे, गोल्ड आणि रेड या चार आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. या मॉडेलमध्ये फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्कसह वाय-फाय, ब्ल्यू-टुथ, जीपीएस आदी फिचर्स असतील. या मॉडेलमधील मुख्य कॅमेरा १३ मेगापिक्सल्सचा तर ५ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here