स्वाईपचा ड्युअल कॅमेरायुक्त स्मार्टफोन

0

स्वाईप कंपनीने ड्युअल कॅमेरा सेटअप असणारा स्वाईप एलीट ड्युअल हा स्मार्टफोन अवघ्या ३,९९९ रूपये मूल्यात ग्राहकांना सादर केला आहे.

स्वाईप एलीट ड्युअल या स्मार्टफोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅश आणि ऑटो-फोकसने युक्त असणारे ८ व २ मेगापिक्सल्स क्षमतांचे कॅमेरे दिले आहेत. यातील एक आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील आहे. यांच्या मदतीने अतिशय उत्तम दर्जाच्या प्रतिमा काढता येणार आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल. यात ५ मेगापिक्सल्सचा शॅटरप्रूफ डिस्प्ले देण्यात आला आहे. इतक्या कमी मूल्यात मजबूत डिस्प्ले हेदेखील या स्मार्टफोनचे वैशिष्टय मानले जात आहे. यात क्वॉड-कोअर प्रोसेसर दिला आहे. याची रॅम १ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ८ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे असून यात ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली आहे. तसेच यात फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्टदेखील असेल. उच्च आणि मध्यम श्रेणीतल्या स्मार्टफोन्समधील अविभाज्य घटक असणारा ड्युअल कॅमेरा आता किफायतशीर मॉडेल्समध्येही देण्यात येत आहे. यातच स्वाईप कंपनीने या प्रकारातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच करून या प्रकारात अन्य मॉडेल्सला तगडे आव्हान उभे केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here