स्मार्टवॉचमध्येच स्मार्टफोन आणि ३६० कॅमेरा

0

शेल या कंपनीने एक भन्नाट उपकरण सादर करण्याचे घोषीत केले असून यात स्मार्टवॉचसोबत स्मार्टफोन आणि ३६० अंशातील चित्रीकरणास सक्षम असणारा कॅमेरा देण्यात आला आहे.

अलीकडच्या काळात काही स्मार्टफोनमध्ये फोर-जी नेटवर्कचा सपोर्ट देण्यात आला आहे. अर्थात स्मार्टवॉचवरून कॉल करणे वा कॉल रिसीव्ह करणे सहजशक्य आहे. तथापि, याच्या अगदी विरूध्द म्हणजे स्मार्टवॉच आणि स्मार्टफोन या दोन्ही प्रकारांमध्ये स्वतंत्रपणे वापरण्यास सक्षम असणारे उपकरण शेल या स्टार्टपने सादर करण्याचे जाहीर केले आहे. यानुसार हे स्मार्टवॉच फोर-जी स्मार्टफोनमध्ये सहजपणे परिवर्तीत होऊ शकते. एवढेच नव्हे तर याच्या मदतीने ३६० अंशातील प्रतिमादेखील काढता येतात. हे उपकरण वॉटरप्रूफ असल्यामुळे पाण्यातही वापरता येते. कनेक्टिीव्हिटीसाठी यात वाय-फाय, जीपीएस आणि ब्ल्यु-टुथ हे पर्याय असतील. तर यात वर नमूद केल्यानुसार फोर-जी नेटवर्क कनेक्टीव्हिटी दिलेली असेल.

शेल या उपकरणातील बॅटरीसह अन्य फिचर्स तसेच याचे मूल्य आदींबाबत सध्या तरी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तथापि, या महिन्याच्या अखेरीस हे उपकरण ‘इंडिगोगो’ या क्राऊडफंडींग जमा करणार्‍या संकेतस्थळावर सादर करण्यात येणार आहे. येथून जमा झालेल्या भांडवलाच्या मदतीने हे उपकरण लवकरच जागतिक बाजारपेठेत उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे.

पहा : शेल उपकरणाची कार्यपध्दती दर्शविणारा व्हिडीओ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here