स्मार्टफोनच्या स्क्रीनचे होते गुपचूप रेकॉर्डींग

0

स्मार्टफोनच्या स्क्रीनचे गुप्तपणे रेकॉर्डींग करून ते थर्ड पार्टी स्मार्टफोन अ‍ॅप्लीकेशन्सकडे पाठविण्यात येत असल्याचा खळबजनक दावा शास्त्रज्ञांच्या एका पथकाने केला आहे.

कोणत्याही स्मार्टफोनच्या युजरसाठी थर्ड पार्टी अ‍ॅप्लीकेशन्स हे अत्यावश्यक असले तरी यातून फार मोठा धोका उद्भवत असल्याचे आरोप अनेक वर्षांपासून होत आहे. या अनुषंगाने अमेरिकेतील नॉर्दर्नइस्टर्न विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या एका पथकाने केलेल्या प्रदीर्घ अध्ययनातून धक्कादायक बाब समोर आली आहे. बरेचसे अ‍ॅप्लीकेशन्स हे स्मार्टफोनच्या मायक्रोफोनमधून संबंधीत युजरच्या प्रत्येक घडामोडीवर नजर ठेवत असल्याचा आरोप कधीपासूनच होत आहे. यामुळे त्या युजरच्या भोवतालाबाबतची सर्व माहिती विविध स्मार्टफोन अ‍ॅप्लीकेशन्सकडे जमा होत असल्याचे दावेदेखील करण्यात आले आहेत. अगदी फेसबुकवरही अशा प्रकारचे आरोप करण्यात आले आहेत. याबाबत अनेकदा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीदेखील झडल्या आहेत. या पार्श्‍वभूमिवर, शास्त्रज्ञांच्या या पथकाने याबाबत प्रदीर्घ काळापर्यंत सखोल अध्ययन करून याचे निष्कर्ष नुकतेच जाहीर केले आहेत.

स्मार्टफोनच्या मायक्रोफोनमधून हेरगिरी होत असल्याच्या आरोपाची शहानिशा करण्यासाठी हे अध्ययन करण्यात आले. याच्या अंतर्गत तब्बल १७ हजार अ‍ॅप्लीकेशन्सच्या फंक्शन्सची बारकाईने तपासणी करण्यात आली. यातील सुमारे नऊ हजार अ‍ॅप्समध्ये युजरकडून त्याचा कॅमेरा आणि मायक्रोफोनचा अ‍ॅक्सेस मागण्यात आला होता. तथापि, यात युजरच्या घडामोडींना रेकॉर्ड करून त्या अ‍ॅपकडे पाठविले जात असल्याचा कोणताही पुरावा आढळून आला नाही. मात्र, याहून धक्कादायक बाब या अध्ययनातून स्पष्ट झाली. यात युजरला कोणताही सुगावा लागू न देता, त्याच्या स्क्रीनचे रेकॉर्डींग करून याला इमेज आणि व्हिडीओ फॉर्मेटमध्ये काही अ‍ॅप्लीकेशन्सकडे पाठविण्यात येत असल्याचे आढळून आले. यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे या अ‍ॅप्लीकेशन्समध्ये काही विख्यात अ‍ॅप्सचाही समावेश असल्याचा या अध्ययनातून स्पष्ट झाले आहे. यामुळे युजर्सच्या गोपनीयतेचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखीत झाला आहे.

टेकवार्ताविषयी

टेकवार्ता : आपल्या माय मराठी भाषेत तंत्रज्ञान अर्थात टेक्नॉलॉजी क्षेत्रातील सर्व घडामोडी येथे आपल्याला मिळतील. यात मराठी टेक न्यूज, गॅजेट न्यूज, सोशल मीडिया, स्मार्टफोन न्यूज, रिव्ह्यूज, व्हायरल न्यूज, ट्रेंड, टेक टिप्स, अ‍ॅप्स, गेम्स, मराठी टेक, मराठी टेक न्यूज आदींचा समावेश आहे.

Techvarta : Only tech news portal in marathi language. Marathi Technology News, Technews in marathi, gadgets news in marathi, smartphone news in marathi, social media news in marathi, viral news in marathi, trending news in marathi, reviews in marathi apps news in marathi, marathi tech news, marathi tech.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here