स्नॅपडील या ऑनलाईन ई-पोर्टलने आता आपली मोबाईल वेबसाईट भारतीय भाषांमध्ये सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतात इंग्रजी समजणार्यांची संख्या मोठी असली तरी अद्यापही एका मोठ्या समुहाला यासाठी अडचणी येतात. यातच ई-कॉमर्स कंपन्यांना द्वितीय आणि तृतीय श्रेणीतल्या शहरांमधून लक्षणीय प्रमाणात व्यवसाय मिळत आहे. याचा विचार करता भारतीय भाषांमध्ये ई-कॉमर्स साईटवरील विविध माहिती उपलब्ध होणे आवश्यक आहे. नेमका हाच विचार करून स्नॅपडील हा विख्यात ई-शॉपिंग पोर्टलने आपली मोबाईल वेबसाईट भारतीय भाषांमध्ये सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. खरं तर स्नॅपडीलची डेस्कटॉप वेबसाईट आधीच भारतीय भाषांमध्ये असतांना मोबाईल वेबसाईट आजवर फक्त इंग्रजीत होती. या पार्श्वभुमिवर ही साईट प्रथम हिंदी आणि तेलगू भाषेत सादर करण्यात आली असून लवकरच मराठीसह अन्य भाषांमध्ये आपल्याला स्नॅपडील पहावयास मिळणार आहे.