स्नॅपडीलची ‘वॅलेट ऑन डिलीव्हरी’ सेवा

0
wallet-on-delivery-of-freecharge

स्नॅपडील कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी ‘कॅश ऑन डिलीव्हरी’सोबत आता ‘वॅलेट ऑन डिलीव्हरी’ ही प्रणाली सादर केली आहे.

केंद्र सरकारने पाचशे व हजारांच्या नोटा बाद केल्याचा ई-कॉमर्स क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. या पार्श्‍वभुमिवर स्नॅपडील कंपनीने यातून मार्ग काढत ‘वॅलेट ऑन डिलीव्हरी’ ही प्रणाली अंमलात आणण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत स्नॅपडीलचीच मालकी असणार्‍या ‘फ्रिचार्ज’ या वॅलेटची मदत घेण्यात आली आहे. या अंतर्गत ग्राहकाला वस्तू मिळाल्यानंतर त्याने ‘फ्रिचार्ज’च्या मदतीने पेमेंट करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here