स्टुडिओ मोड कॅमेर्‍याने युक्त लाव्हाचा स्मार्टफोन

0

लाव्हा कंपनीने स्टुडिओ मोड कॅमेर्‍याने युक्त असणारा लाव्हा झेड८१ हा स्मार्टफोन दोन व्हेरियंटमध्ये बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

लाव्हा कंपनीने आजवर किफायतशीर मूल्य असणार्‍या मॉडेल्सला सातत्याने प्राधान्य दिले आहे. लाव्हा झेड८१ हे मॉडेलदेखील याच प्रकारातील आहे. याला २ जीबी आणि ३ जीबी रॅम अशा दोन पर्यायांमध्ये बाजारपेठेत उतारण्यात आले आहे. यातील ३ जीबी रॅमयुक्त स्मार्टफोन ९,४९९ रूपये मूल्यात मिळणार असला तरी २ जीबी रॅमच्या मॉडेलचे मूल्य आणि याच्या उपलब्धतेबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. या मॉडेलमधील सर्वात लक्षवेधी फिचर म्हणजे याच्या कॅमेर्‍यात असलेला स्टुडिओ मोड होय. हे एआय म्हणजेच कृत्रीम बुध्दीमत्तेने युक्त असणारे फिचर आहे. याच्या मदतीने युजरला स्प्लॅश, स्टेज लाईट, स्टेज लाईट मोनो, नॅचरल व्हायब्रंट आणि कुंटू आदींसारखे लायटींग इफेक्ट वापरता येणार आहेत. अर्थात याच्या मदतीने अतिशय दर्जेदार अशा प्रतिमा आणि सेल्फी घेता येणार आहेत. रिअल आणि फ्रंट या दोन्ही कॅमेर्‍यांमध्ये ही सुविधा देण्यात आलेली आहे. यातील रिअर कॅमेरा हा १३ तर फ्रंट कॅमेराही १३ मेगापिक्सल्स क्षमतेचा आहे. यात स्वीफ्टकी हा कीबोर्ड प्रदान करण्यात आला आहे. याच्या मदतीने वर्ड प्रेडिक्शन व करेक्शनची सुविधा देण्यात आलेली आहे. याशिवाय, यात इंग्रजीतील एसएमएस हा १५ भारतीय भाषांमध्ये वापरण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.

लाव्हा झेड ८१ या मॉडेलमध्ये ५.७ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस म्हणजे १४४० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले देण्यात आला असून यावर कॉर्नींग गोरीला ग्लासचे संरक्षक आवरण देण्यात आले आहे. यात ऑक्टा-कोअर हेलिओ ए २२ हा प्रोसेसर दिला आहे. वर नमूद केल्यानुसार याचे २ जीबी व ३ जीबी रॅम असे व्हेरियंट असून दोन्हींमध्ये ३२ जीबी इनबिल्ट स्टोअरेज दिले आहे. मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने याला वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. या मॉडेलमध्ये ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आलेली आहे. हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरियो या आवृत्तीवर चालणारे असून यावर स्टार ओएस ५.० हा युजर इंटरफेस देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here