सौर उर्जेवर चालणारा वायरलेस स्पीकर

0

झुक कंपनीने सौर उर्जेवर चालणारा झेडबी-सोलर म्युज हा वायरलेस स्पीकर भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

भारतीय बाजारपेठेत वायरलेस स्पीकर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होऊ लागले आहेत. अनेक कंपन्या नवनवीन फिचर्सने सज्ज असणारे वायरलेस स्पीकर लाँच करत आहेत. यात आता झेडबी-सोलर या मॉडेलची भर पडली आहे. यातील सर्वात लक्षवेधी फिचर म्हणजे हा स्पीकर सौर उर्जेवर चालणारा आहे. याला एक सोलर पॅनल लावण्यात आलेले असून याच्या मदतीने या मॉडेलमधील बॅटरी चार्ज होत असते. ही बॅटरी एकदा चार्ज झाल्यानंतर ३० तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर अवघ्या १० मिनिटांच्या सोलर चार्जींगमुळे हा स्पीकर ३० मिनिटांपर्यंत चालत असल्याचेही कंपनीने नमूद केले आहे. ब्ल्युटुथच्या मदतीने हा स्पीकर स्मार्टफोन तसेच अन्य उपकरणांना कनेक्ट करता येतो. यात थ्रीडी सराऊंड या प्रकरातील ध्वनीची अनुभूती घेता येते. यात एलईडी डिस्प्लेदेखील देण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे हा वायरलेस स्पीकर वॉटरप्रूफ, डस्टप्रूफ आणि शॉकप्रूफ आहे. अर्थात यामुळे हे मॉडेल कोणत्याही वातावरणात वापरता येणार आहे. ग्राहकांना हा स्पीकर ४,९९० रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here