सोनी कंपनीची ५.१ होम थिएटर सिस्टीम

0

सोनी कंपनीने भारतात ५.१ चॅनलने युक्त असणारी एचटी-आरटी४० ही होम थिएटर सिस्टीम २२९९० रूपये मूल्यात ग्राहकांना सादर केली आहे.

वास्तविक पाहता अलीकडच्या काळात अनेक टिव्हींमध्ये अतिशय उत्तम दर्जाची ध्वनी प्रणाली देण्यात आलेली असते. तरीही सुश्राव्य आणि अतिशय उत्तम दर्जाच्या श्रवणानुभुतीसाठी होम थिएटर प्रणालीस कोणताही सक्षम पर्याय नाही. अर्थात उत्तम टिव्हीला तेवढ्याच दर्जाची होम थिएटर प्रणालीदेखील आवश्यक असते. या पार्श्‍वभूमिवर, सोनी कंपनीने एचटी-आरटी४० हे मॉडेल भारतीय ग्राहकांना उपलब्ध केले आहे. ही सिस्टीम ५.१ चॅनलयुक्त असल्याने अर्थातच यात पाच स्पीकर्स आणि एक सब-वुफर देण्यात आलेले आहे. यात मागील बाजूस टॉल बॉय या दोन उंच टॉवरसमान स्पीकर्सचा समावेश असेल. याच्या मदतीने घरात राहूनही थिएटरमध्ये आनंद लुटत असल्याची अनुभुती घेता येते. तर या सहाही स्पीकर्सच्या मदतीने अतिशय सुश्राव्य अशा सराऊंड साऊंड ध्वनीचा आनंद मिळतो. अर्थात याला डॉल्बी डिजीटल तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने याला नवीन आयाम मिळत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.

सोनी एचटी-आरटी४० या मॉडेलमध्ये एचडीएमआय, युएसबी आणि ऑप्टीकल इनपुट कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. तर एनएफसी आणि ब्ल्यू-टुथ तंत्रज्ञानाच्या मदतीने स्मार्टफोनसह अन्य उपकरणांमधील संगीताचा यावर आपण आनंद घेऊ शकतो. तर या मॉडेलमध्ये क्लिअर ऑडिओ+, गेम, स्पोर्टस्, मुव्ही, स्टँडर्ड आणि म्युझिक या सहा मोडमध्ये संगीत ऐकता येते. या मॉडेलमध्ये एकंदरीत ६०० वॅट इतक्या क्षमतेचे पॉवर आऊटपुट असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here