सोनी कंपनीचा दिवाळी धमाका; विविध उत्पादनांवर आकर्षक सवलती

0

सोनी कंपनीने दिवाळीच्या कालखंडात आपल्या विविध उत्पादनांवर अतिशय आकर्षक सवलती देऊ करत यातून ग्राहकांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

सणासुदीच्या कालखंडात भारतीय ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतो. नेमकी ही बाब लक्षात घेत विविध कंपन्या या कालावधीत विविध उत्पादने लाँच करत असतात. यासोबत उत्पादनांवर सवलतीदेखील देत असतात. या पार्श्‍वभूमिवर, सोनी कंपनीनेही भारतीय ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. यात टिव्ही, डिजीटल कॅमेरे, कॅमकॉर्डर, गेमींग कन्सोल आदींसह अन्य प्रॉडक्टचा समावेश आहे. १९ ऑक्टोबरपर्यंत या विविध ऑफर्स सादर करण्यात आल्या आहेत.

सोनी कंपनीच्या ए१ या मालिकेतील ओएलईडी टिव्ही, एक्स९५००ई टिव्ही आणि एक्स९४००ई टिव्ही या मॉडेल्सचे मूल्य ६,०४,९०० ते ३,०४,९०० रूपयांच्या दरम्यान आहे. यांच्या खरेदीवर ग्राहकाला एक टेराबाईट स्टोअरेज असणारे प्लेस्टेशन ४ हे गेमिंग कन्सोल (मूल्य ३७,९९० रूपये) अगदी मोफत मिळणार आहे. यासोबत नेटफ्लिक्स या स्ट्रीमिंग सेवेचे ४,८०० रूपये मूल्य असणारे सहा महिन्यांपर्यंतचे सबस्क्रीप्शनदेखील प्रदान करण्यात येणार आहे. तर ब्राव्हिया या मालिकेतील टिव्हीसोबत किंडल ई-बुक रीडर, मोफत एक्सबी२ वायरलेस स्पीकर आणि नेटफ्लिक्सचे सहा महिन्यांचे सबस्क्रीप्शन मोफत मिळेल. तर या मालिकेतील काही टिव्हींसोबत रिलायन्स जिओ-फायचे डोंगल मिळणार आहेत.

सोनी कंपनीच्या होम थिएटर सिस्टीम्ससोबत ७२० रूपये मूल्य असणारा १६ जीबी साठवण क्षमतेचा पेन ड्राईव्ह मोफत मिळेल. तर सोनी डिजीटल कॅमेर्‍यांसोबत मेमरी कार्ड, कॅरी केस, एचडीएमआय केबल आणि रिचार्जेबल बॅटरीज मिळतील. तर एक्सपेरिया मालिकेतील स्मार्टफोन्ससोबत तीन महिन्यांचे सोनी लिव्ह अ‍ॅपचे सबस्क्रीप्शन, युएसबी टाईप-सी चार्जर आदी देण्यात येणार आहेत. तर ऑडिओ उपकरणांच्या मूल्यात कपात करण्यात आली आहे. यामुळे आता २१,९९० रूपये मूल्य असणारा एमडीआर-१००एबीएन हा वायरलेस हेडफोन आता १७,५९० रूपयात ग्राहकांना सादर करण्यात आला आहे. तर एसआरए-एक्सबी१०, एसआरएस-एक्सबी२० आणि एसआरएस-एक्सबी३० या मॉडेल्सवर अनुक्रमे १४००; २,००० आणि ३,००० रूपये मूल्याची सवलत मिळत आहे. तसेच सोनी कंपनीचा एनडब्ल्यू-ए३५ हा वॉकमनदेखील ग्राहकांना १२,७९० रूपये या सवलतीच्या दरात उपलब्ध करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here