सोनीच्या तीन प्रिमीयम ऑडिओ सिस्टीम्स

0

सोनी कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी उच्च श्रेणीतील तीन नवीन ऑडिओ सिस्टीम्स सादर केल्या असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

सोनी कंपनी आपल्या अतिशय दर्जेदार ऑडिओ सिस्टीम्ससाठी ख्यात आहेत. या लौकीकाला जपत सोनीने एमएचसी-व्ही४१डी, एमएचसी-व्ही७१डी आणि एचएचसी-व्ही८१डी या तीन ऑडिओ सिस्टीम्स भारतीय बाजारपेठेत उतारल्या आहेत. यांचे मूल्य अनुक्रमे ३१,९९०; ४१,९९० आणि ५१,९९० रूपये आहे. हे तिन्ही मॉडेल्स काळ्या रंगात उपलब्ध आहेत. यातील सर्वात लक्षणीय फिचर म्हणजे यासाठी कोणतेही एक्सटर्नल डीव्हीडी प्लेअर लावण्याची आवश्यकता नसून ही सुविधा यात इन-बिल्ट अवस्थेतच प्रदान करण्यात आली आहे. तसेच यात कनेक्टीव्हिटीसाठी ब्ल्यु-टुथ आणि एनएफसी या प्रणालींचा वापर करण्यात आला आहे. यामुळे स्मार्टफोनसह अन्य उपकरणांवरील म्युझिक स्ट्रीमिंगचा यावर आनंद घेता येणार आहे. याला एचडीएमआय पोर्टच्या माध्यमातून टिव्हीशी संलग्न करणेही शक्य आहे. या ऑडिओ सिस्टीम्स वापरण्यासाठी अतिशय सुलभ असून एका टॉवरच्या आकारातील व यातही खाली चाके लावलेली असल्यामुळे खर्‍या अर्थाने पोर्टेबल आहेत.

सोनीच्या या तिन्ही ऑडिओ सिस्टीम्समध्ये टायको मोड प्रदान करण्यात आला आहे. याच्या अंतर्गत या सिस्टीमच्या वरील बाजूस एक टचपॅड देण्यात आला आहे. हा टचपॅड ड्रमचे काम करतो. आणी याचा वापर करून कुणीही आपल्याला हव्या असणार्‍या गाण्यावर बोटांनी टिचक्या मारत ठेका धरू शकतो. तर टायको गेम मोडमध्ये जाऊन ठेक्यांवर आधारित गेमदेखील खेळता येणार आहे. ३६० डिग्री ऑडिओ फिचरमुळे याच्या मदतीने सर्व बाजूंना सम प्रमाणात ध्वनीचा आनंद घेता येणार आहे. यामध्ये मायक्रोफोन तसेच गिटारला कनेक्ट करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तर याताच्या हालचालींनी म्युझिक ट्रॅक तसेच ध्वनी कमी-जास्त करण्याची सुविधादेखील यामध्ये देण्यात आली आहे.

सोनीच्या या तिन्ही ऑडिओ सिस्टीम्स सोनी म्युझिक सेंटर अ‍ॅपच्या माध्यमातून स्मार्टफोनला कनेक्ट करता येणार आहे. यात प्ले-लिस्टसह विविध कस्टमायझेशन्सच्या सुविधा आहेत. तसेच यावरून ऑडिओ सिस्टीमवर असणार्‍या आकर्षक लाईटचे नियंत्रणही करता येईल. सोनी कंपनीच्या देशभरातील शोरूम्समधून या तिन्ही ऑडिओ सिस्टीम्स ग्राहकांना उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here