सोनीचा नॉईज कॅन्सलेशन तंत्रज्ञानाने युक्त प्रिमीयम हेडफोन

0
सोनी प्रिमीयम हेडफोन, sony-premium-headphone

सोनी कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी डब्ल्यूएच-१०००एक्सएम३ हा प्रिमीयम अर्थात उच्च श्रेणीतला स्मार्टफोन सादर करण्याची घोषणा केली आहे.

भारतीय बाजारपेठेत हेडफोन मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत. अन्य उपकरणांप्रमाणे या क्षेत्रातही अगदी स्वस्त आणि मध्यम किंमतपट्टयातील मॉडेल्सला प्रचंड प्रमाणात मागणी आहे. तथापि, यासोबत उच्च श्रेणीतील हेडफोन्सचाही चाहता वर्ग देशात आहे. यामुळे काही कंपन्या प्रिमीयम मॉडेल्सला प्राधान्य देतांना दिसत आहेत. या अनुषंगाने आता सोनी कंपनीने डब्ल्यूएच-१०००एक्सएम३ हा हेडफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. याचे मूल्य २९,९९० रूपये असून याची अमेझॉन इंडिया व क्रोमा स्टोअर्समधून अगावू नोंदणी सुरू करण्यात आली आहे. ग्राहकांना प्रत्यक्षात हे मॉडेल १८ ऑक्टोबरपासून खरेदी करता येणार आहे. या क्युएन१ हा एचडी अद्ययावत नॉईस कॅन्सलेशन प्रोसेसर देण्यात आलेला आहे. यामुळे यात बाहेरीला आवाजांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. अर्थात युजर या हेडफोनच्या मदतीने बाह्य ध्वनीच्या अडथळ्यांचा त्रास न होता संगीताचा आनंद घेऊ शकतो. तसेच यामध्ये ड्युअल नॉईस सेन्सरला देण्यात आलेले आहे. या हेडफोनमधून युजरला हाय-रेझोल्युशन या प्रकारातील ध्वनीची अनुभूती घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.

सोनीच्या या हेडफोन मॉडेलमध्ये क्विक अटेन्शन मोड हे अभिनव फिचर देण्यात आले आहे. याच्या मदतीने युजर हा हेडफोनवरून संगीत ऐकत असतांना त्याला त्याच्या भोवताली नेमके काय चालले आहे? याची माहिती मिळू शकते. यासाठी यामध्ये तात्काळ व्हॉल्युम नियंत्रीत करण्याची सुविधा दिलेली आहे. यामध्ये अडॅप्टिव्ह साऊंड कंट्रोल हे नाविन्यपूर्ण फिचरदेखील दिलेले आहे. याच्या मदतीने युजरच्या शारिरीक हालचालींची अचूक माहिती मिळून याच्याशी संबंधीत बाह्य आवाज ऐकू येईल अशी सेटींग स्वयंचलीत पध्दतीत करण्यात येते. हा हेडफोन ब्ल्यु-टुथच्या मदतीने स्मार्टफोनसह अन्य उपकरणांना कनेक्ट करता येतो. तसेच यामध्ये ऑडिओ जॅकदेखील दिलेले आहे. यामुळे हे मॉडेल वायर्ड या प्रकारातही वापरणे शक्य आहे. लक्षणीय बाब म्हणजे यात एनएफसी हे फिचर दिलेले आहे. यातील बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल ३० तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here