सेन्सर्सच्या माध्यमातून स्मार्टफोन हॅकींगचा धोका

0

स्मार्टफोनमधील सेन्सर्सच्या मदतीने स्मार्टफोन हॅक करणे शक्य असल्याचे एका अध्ययनातून अधोरेखित झाले आहे.

स्मार्टफोनमधील सेन्सर्सच्या माध्यमातून कोणत्याही स्मार्टफोनमध्ये गोपनीयरित्या शिरणे शक्य असल्याचे एका अध्ययनातून दिसून आले आहे. या संदर्भात संशोधन करून याचे निष्कर्ष क्रिप्टोलॉजी ई-प्रिंट आर्काईव्हवर प्रकाशित करण्यात आले आहे. सिंगापूर येथील नानयांग टेक्नॉलॉजी युनिव्हर्सीटीचे शिवम भसीन आणि त्यांच्या सहकार्‍यांनी या संदर्भात अध्ययन करून याचा रिसर्च पेपर सादर केला आहे. सध्या विविध स्मार्टफोन्समध्ये अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, प्रॉक्झिमिटी सेन्सर, अँबिअंट लाईट सेन्सर, मॅग्नेटोमीटर आणि बॅरोमीटर व अन्य सेन्सर्स असतात. कोणतेही अ‍ॅप इन्स्टॉल करतांना सेन्सर्सच्या वापराच्या परवानगीची आवश्यकता भासत नाही. नेमक्या याचाच वापर करून सेन्सर्सच्या माध्यमातून स्मार्टफोन हॅक करता येत असल्याचे भसीन आणि त्यांच्या सहकार्‍यांनी सिध्द केले आहे. कोणताही युजर हा स्मार्टफोनवरी सिक्युरिटी पीन टाकण्यासह अन्य फंक्शन्सचा वापर करत असतांना विशिष्ट पध्दतीने टचस्क्रीनवर दबाव टाकत असतो. याला विविध सेन्सर्स आपापल्या परीने प्रतिसाद देत असतात. याचाच वापर करून ९९.५ टक्के इतक्या अचूकपणे स्मार्टफोनचा सिक्युरिटी पीन मिळवत स्मार्टफोन हॅक करता येत असल्याचे या अध्ययनातून दिसून आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here