सॅमसंग गॅलेक्सी टॅब अ‍ॅक्टीव्ह २ दाखल

0

सॅमसंग कंपनीने आपला सॅमसंग गॅलेक्सी टॅब अ‍ॅक्टीव्ह २ हा टॅबलेट बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून हे मॉडेल डस्ट व वॉटरप्रूफ आहे.

सॅमसंग गॅलेक्सी टॅब अ‍ॅक्टीव्ह २ या मॉडेलमध्ये आठ इंच आकारमानाचा १२८० बाय ८०० पिक्सल्स क्षमतेचा टिएफटी डिस्प्ले आहे. यात ऑक्टा-कोअर एक्झीनॉस ७८८० प्रोसेसर असेल. या मॉडेलची रॅम ३ जीबी आणि स्टोअरेज १६ जीबी असून ती मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी टॅब अ‍ॅक्टीव्ह २ या टॅबलेटमध्ये आयपी६८ प्रमाणपत्र असून हा टॅबलेट वॉटरप्रूफ असेल. तसेच तो डस्टप्रूफही असून अगदी हातमोजे (ग्लोव्हज) घातलेले असतांनाचही याचा टचस्क्रीन डिस्प्ले वापरता येणार आहे. यावर सॅमसंगच्या एस पेनही वापरता येणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे यात सॅमसंग कंपनीने विकसित केलेला बिक्सबी हा डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंट आणि फिंगरप्रिंट स्कॅनरदेखील प्रदान करण्यात आले आहे. तर यातील बॅटरी ४५०० मिलीअँपिअर क्षमतेची असेल. हा टॅबलेट अँड्रॉइडच्या नोगट ७.१ या आवृत्तीवर आधारित असणार्‍या टचविझ या प्रणालीवर चालणारा असेल. यात कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, ब्ल्यु-टुथ व युएसबी टाईप-सी पोर्ट या सुविधा असतील. युरोपात हे मॉडेल ५०० युरो मूल्यात उपलब्ध करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here