सॅमसंगचा सेल्फी स्पेशल स्मार्टफोन झाला स्वस्त !

0

सॅमसंगने खास सेल्फी प्रेमींसाठी सादर केलेला सी७ प्रो या स्मार्टफोनच्या मूल्यात कपात करण्याची घोषणा केली आहे.

सॅमसंगने एक वर्षापूर्वी अर्थात एप्रिल २०१७ मध्ये गॅलेक्सी सी७ प्रो या नावाने मॉडल २७,९९० रूपये मूल्यात लाँच केले होते. मध्यंतरी याचे मूल्य ३,००० रूपयांनी कमी करण्यात आले होते. आता यात पुन्हा २,५०० रूपयांची कपात करण्यात आली आहे. यामुळे हे मॉडेल आता ग्राहकांना अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून २२,४०० रूपयात खरेदी करता येणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी सी ७ प्रो हे मॉडेल कॅमेरा केंद्रीत आहे. यामध्ये एलईडी फ्लॅश आणि एफ/१.९ अपार्चरयुक्त १६ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यातील मुख्य कॅमेरादेखील १६ मेगापिक्सल्स क्षमतेचा असेल. हे दोन्ही कॅमेरे ३० फ्रेम्स प्रतिसेकंद या गतीने हाय डेफिनेशन प्रतीची व्हिडीओ रेकॉर्डींग करण्यास सक्षम आहेत. यात ५.७ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी म्हणजेच १९२० बाय १२८० पिक्सल्स क्षमतेचा सुपर अमोलेड डिस्प्ले आहे. यात ऑक्टा-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६३५ प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम चार जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा दिलेली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी सी ७ प्रो या मॉडेलमध्ये क्विकचार्ज ३.० या तंत्रज्ञानाने युक्त असणारी ३३०० मिलीअँपिअर प्रति तास इतक्या क्षमतेची बॅटरी आहे. यातील होम बटनच्या खाली फिंगरप्रिंट स्कॅनर असेल. सॅमसंग कंपनीने खास विकसित केलेले आल्वेज ऑन डिस्प्ले हे फिचर यात प्रदान करण्यात आले आहे. तसेच यात कंपनीच्या सॅमसंग पे या प्रणालीचा सपोर्टदेखील देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here