सॅमसंगचा गॅलेक्सी जे ६ झाला स्वस्त

0
सॅमसंगचा गॅलेक्सी जे ६,सॅमसंग गॅलेक्सी जे ६, samsung galaxy j 6

सॅमसंगचा गॅलेक्सी जे ६ (४ जीबी व्हेरियंट) हा स्मार्टफोन आता भारतीय ग्राहकांना सवलतीच्या दरात उपलब्ध करण्यात आला आहे.

सॅमसंगचा गॅलेक्सी जे ६ हा स्मार्टफोन दोन व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आला होता. याचे ३ जीबी रॅम/३२ जीबी स्टोअरेजचे व्हेरियंट हे १३,९९० तर ४ जीबी रॅम/६४ जीबी स्टोअरेजचे मूल्य १६,४९० रूपये होते. आता यामध्ये ५०० रूपयांची कपात करण्यात आली आहे. यामुळे हा स्मार्टफोन १५,९९० रूपये मूल्यात ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. वाढत्या स्पर्धेमुळे बहुतांश कंपन्या वेळोवेळी आपल्या विविध मॉडेल्सच्या मूल्यात कपात करत असतात. या अनुषंगाने सॅमसंगचा गॅलेक्सी जे ६ हा स्मार्टफोन आता थोड्या का होईना अल्प मूल्यात ग्राहकांना मिळणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी जे ६ या मॉडेलमध्ये कंपनीचा ऑक्टा-कोअर एक्झीनॉस ७८७० हा गतीमान प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये फुल व्ह्यू या प्रकारातील, ५.६ इंच आकारमानाचा, एचडी प्लस (१४४० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे गुणोत्तर १८:५:९ इतके आहे. यातील मुख्य कॅमेरा १३ मेगापिक्सल्स तर फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सल्स क्षमतेचा आहे. याच्याच मदतीने यामध्ये ‘फेस अनलॉक’ हे फिचर प्रदान करण्यात आले आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ओरियो या आवृत्तीवर चालणारा असून यावर कंपनीचा एक्सपेरियन्स हा युजर इंटरफेस देण्यात आला आहे. तर यामध्ये ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

टेकवार्ताविषयी

टेकवार्ता : आपल्या माय मराठी भाषेत तंत्रज्ञान अर्थात टेक्नॉलॉजी क्षेत्रातील सर्व घडामोडी येथे आपल्याला मिळतील. यात मराठी टेक न्यूज, गॅजेट न्यूज, सोशल मीडिया, स्मार्टफोन न्यूज, रिव्ह्यूज, व्हायरल न्यूज, ट्रेंड, टेक टिप्स, अ‍ॅप्स, गेम्स, मराठी टेक, मराठी टेक न्यूज आदींचा समावेश आहे.

Techvarta : Only tech news portal in marathi language. Marathi Technology News, Technews in marathi, gadgets news in marathi, smartphone news in marathi, social media news in marathi, viral news in marathi, trending news in marathi, reviews in marathi apps news in marathi, marathi tech news, marathi tech.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here