सुझुकी गिक्सर एसएफ एबीएस दाखल

0

सुझुकी कंपनीने आपली सुझुकी गिक्सर एसएफ एबीएस ही दुचाकी भारतीय बाजारपेठेत उतारली असून ग्राहकांनी हे मॉडेल दोन व्हेरियंटमध्ये खरेदी करता येईल.

नावातच नमूद असल्यानुसार सुझुकी गिक्सर एसएफ एबीएस या मॉडेलमध्ये एबीएस म्हणजेच अँटी लॉक ब्रेक ही प्रणाली प्रदान करण्यात आली आहे. याच्या कार्ब्युरेटेड या व्हेरियंटचे एक्स-शोरूम मूल्य ९५,४९९ तर फ्युअल इंजेक्टेडचे मूल्य ९९,३१२ रूपये असेल. केंद्र सरकारने देशातील सर्व दुचाकींसाठी बीएस-४ हे उत्सर्जनाचे मानक अनिवार्य केले आहे. या अनुषंगाने या वर्षाच्या एप्रिल महिन्यात सुझुकी गिक्सर, आणि गिक्सर एसएफ हे दोन मॉडेल लाँच करण्यात आले होते. यातील दुसर्‍या मॉडेलची सुधारित आवृत्ती सुझुकी गिक्सर एसएफ एबीएस या माध्यमातून ग्राहकांना उपलब्ध करण्यात आली आहे. एबीएस या प्रणालीच्या मदतीने अचानक ब्रेक दाबावे लागल्यानंतर अथवा अन्य आपत्कालीन प्रसंगांमध्ये ही बाईक लॉक होत नाही. यामुळे अपघाताचा अनर्थ टळतो. याशिवाय याच्या मदतीने ब्रेक प्रणाली अधिक उत्तमरित्या काम करते. यामुळे एबीडी फिचरच्या मदतीने सुझुकी गिक्सर एसएफ एबीएस हे मॉडेल अधिक सुरक्षित झाले आहे.

यातील उर्वरित बहुतांश फिचर हे मात्र आधीप्रमाणेच आहेत. अर्थात यात आधीप्रमाणेच १५४.९ सीसी क्षमतेचे सिंगल सिलेंडर इंजिन असून याला ५ स्पीड गिअर्सची जोड दिलेली असेल. तर याच्या फ्युअल इंजेक्टेड व्हेरियंटमध्ये इंधनाचा पुरवठा व्यवस्थितरित्या होण्यासाठी सहा सेन्सर्स प्रदान करण्यात आलेले आहेत. अर्थात यामुळे उत्तम मायलेज मिळून इंजिनच्या कार्यक्षमतेत वृध्दी होते. तर बाह्यांगाच्या बदलांचा विचार करता यामध्ये तीन रंगांचा समावेश करण्यात आला आहे. यात फ्युअल टँक आणि मागील बाजूस नवीन लोगो प्रदान करण्यात आला आहे. सुझुकी गिक्सर एसएफ एबीएस या मॉडेलची कंपनीच्या देशभरातील शो-रूम्समधून नोंदणी सुरू करण्यात आली आहे. अर्थात आधीचे सुझुकी गिक्सर एसएफ हे मॉडेलदेखील ग्राहकांना उपलब्ध राहणार असल्याचे कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here