सिस्काचा अलेक्झा सपोर्टयुक्त स्मार्ट एलईडी टेबल लँप

0
स्मार्ट एलईडी टेबल लँप,syska smart led tabel lamp

सिस्का या कंपनीने एलईडीने वायफायला जोडला जाणारा स्मार्ट टेबल लॅम्प बाजारात आणला असून तो अ‍ॅमेझॉन अ‍ॅलेक्साचा सपोर्ट असणारा आहे.

सिस्का स्मार्ट टेबल लॅम्प हा अ‍ॅमेझॉन अ‍ॅलेक्साला एकदा का जोडला गेला की, वापरकर्त्याला आवाजाद्वारे त्याला नियंत्रित करता येते. हा असा दिवा आहे की, जो तीन वेगवेगळ्या रंगांचा उजेड देऊ शकतो. यात वॉर्म व्हाईट, डे लाईट आणि कूल व्हाईट या तीन रंगांचा समावेश आहे.

सिस्का स्मार्ट टेबल लॅम्प हा तीन रंगांचा प्रकाश देणारा असून तुमच्या गरजेनुसार आणि मूडनुसार तुम्ही त्याचे नियोजन करू शकता. तुम्हाला किती उजेड हवा आहे, त्याप्रमाणे तुम्ही बटणाद्वारे प्रकाशाची तीव्रता नियंत्रित करू शकता. हा लॅम्प तुम्ही अत्यंत हळुवारपणे (फेदर टर कंट्रोल) सुरू किंवा बंद करू शकता. तसेच प्रकाशाची तीव्रता नियंत्रित करून शकता. त्याच्या मंद प्रकाशाचा आनंद तुम्ही घेऊ शकता.
कुणीही युजी अ‍ॅमेझॉन अ‍ॅलेक्साला व्हॉईस कमांड देऊन सिस्का स्मार्ट टेबल लॅम्प विनासायास नियंत्रित करू शकतो. याला सहजपणे बंद किंवा सुरू करू शकतो. तसेच त्याला स्पर्श करता देखील तुम्ही प्रकाशाची तीव्रता हवी तशी ठेवू शकतो.

सिस्का स्मार्ट टेबल लॅम्पमध्ये दोन मूड सेटिंग असून ज्याद्वारे युजर गरजेनुसार वाचनासाठी आणि रात्रीसाठी वेगवेगळ्या प्रकशाचे संयोजन करू शकतो. जेव्हा तुम्हाला काम करायचे असेल

सिस्काच्या स्मार्ट एलईडी टेबल लॅम्पची हाताळणी सुलभ करण्याबरोबरच चांगल्या वापरासाठी त्यात लवचिकताही ठेवण्यात आली आहे. डोळ्यांवर कोणत्याही प्रकारचा ताण येऊ न देता युजरला विनासायास वाचनाचा आनंद घेता यावा, म्हणून तो विशिष्ट मर्यादेपर्यंत वाकवण्याची सुविधा यात आहे.

सिस्का स्मार्ट टेबल लॅम्प हा ३०,००० तास टिकणारा आहे. सर्वसाधारण दिव्यांना सीएफएलपेक्षा जास्त वीज लागले. पण एलईडी दिव्यापेक्षा जास्त वीज सीएफल दिव्यांना लागते. सिस्का एलईडी दिवे हे पर्यावरणस्नेही, सुरक्षित आणि फेरवापरायोग्य असून शिसे किंवा पार्‍यासारखे कोणतेही घातक घटक त्यात नाहीत. सिस्का स्मार्ट एलईडी लॅम्प ३० हजार तासांहून अधिक काळ चालतो. हा कालवधी पाच वर्षांहून अधिक आहे. आणखी काय हवे? सिस्का उत्पादनावर दोन वर्षांची वॉरंटी देते. सिस्का स्मार्ट टेबल लॅम्प ३६९९ रुपये या आकर्षक किमतीत अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here