सावधान….व्हाटसअॅपवर या बनावट एक्सल फाईल उघडू नका !

0
whatsapp,व्हाटसअ‍ॅप

व्हाटसअॅपवर बनावट एक्सल फाईलच्या माध्यमातून युजर्सच्या बँक अकाऊंटची माहिती चोरण्याचा प्रकार समोर आला असून युजर्सनी अशा प्रकारच्या कोणत्याही फाईलवर क्लिक करू नये असा इशारा देण्यात आला आहे.

व्हाटसअॅपवर अनेक लिंकमध्ये घातक असे ‘मालवेअर’ असतात. यात आता हॅकर्सनी चतुराईचा वापर करत मायक्रोसॉफ्ट एक्सलच्या एका करप्ट फाईलच्या माध्यमातून माहिती चोरण्याचा अवलंब केल्याचे दिसून आले आहे. यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच ‘एनडीए’ आणि राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच ‘एनआयए’ कडून एखादी फाईल आली असावी अशा पध्दतीने बतावणी करण्यात येते. यासाठी ‘NDA-ranked-8th-toughest-College-in-the-world-to-get-into.xls’ आणि ‘NIA-selection-order-.xls’. या नावांनी दोन फाईल्स पाठविण्यात येतात. कुणालाही हा संदेश ‘एनडीए’ अथवा ‘एनआयए’कडून आल्याचा भास होतो. यामुळे कुणीही यावर क्लिक करतो आणि तेथेच फसतो ! यावर क्लिक केल्यानंतर संबंधीत युजरच्या स्मार्टफोनमधील त्याच्या बँकेच्या ऑनलाईन अकाऊंटसह पीन क्रमांक तसेच अन्य सर्व माहिती सुलभपणे चोरली जाते असे आढळून आले आहे.

यामुळे कुणीही ‘NDA-ranked-8th-toughest-College-in-the-world-to-get-into.xls’ आणि ‘NIA-selection-order-.xls’. अशा नावाने आपल्या मायक्रोसॉफ्ट एक्सेल फाईल्स उघडू नये असे सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी सुचविले आहे. काही युजर्सला याच नावाने पीडीएफ फाईल्सही पाठविण्यात आल्या असून यावरही क्लिक न करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here