सहा जीबी रॅम व चार कॅमेर्‍यांनी युक्त नुबिया झेड १७ मिनी एस

0

झेडटीई कंपनीने सहा जीबी रॅम तसेच चार कॅमेरे असणार्‍या नुबिया झेड १७ मिनी एस या स्मार्टफोनची घोषणा केली आहे.

झेडटीई कंपनीने अलीकडेच नुबिया झेड १७ मिनी हे मॉडेल लाँच केले होते. आता याचीच पुढील आवृत्ती नुबिया झेड १७ मिनी एस या नावाने ग्राहकांना सादर करण्यात येणार आहे. यात ऑक्टा-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६५३ प्रोसेसर असेल. वर नमुद केल्यानुसार याची रॅम सहा जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून यात मात्र मायक्रो-एसडी कार्डचा सपोर्ट दिलेला नाही.

नुबिया झेड १७ मिनी एस या मॉडेलची खासियत म्हणजे यात मुख्य आणि फ्रंट या दोन्ही प्रकारांमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप प्रदान करण्यात आला आहे. याच्या मागील बाजूस प्रत्येकी १३ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे असतील. यातील एक कॅमेरा मोनोक्रोम तर दुसरा आरजीबी या प्रकारातील असेल. याच्या मदतीने अतिशय उत्कृष्ट दर्जाची छायाचित्रे काढता येतील असा कंपनीचा दावा आहे. यात अल्ट्रा फास्ट फोकस हे विशेष फिचरदेखील असेल. तर सेल्फीसाठी यात १६ व ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे कॅमेरे असतील. अर्थात याच्या मदतीने दर्जेदार सेल्फी तसेच व्हिडीओ कॉलींग करता येणार आहे.

नुबिया झेड १७ मिनी एस या स्मार्टफोनमध्ये ५.२ इंच आकारमानाचा तसेच फुल एचडी म्हणजेच १९२० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा वक्राकार डिस्प्ले असून यावर कॉर्निंग गोरीला ग्लास ३ चे संरक्षक आवरण असेल. यात मेटलची युनिबॉडी प्रदान करण्यात आली असून फिंगरप्रिंट स्कॅनरची सुविधादेखील असेल. यात फास्ट चार्जींग असणारी ३,२०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. नुबिया झेड १७ मिनी एस हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे असून यावर कंपनीचा नुबिया ५.० हा युजर इंटरफेस असेल. यात फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्टसह वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, जीपीएस, एनएफसी, युएसबी टाईप-सी आदी फिचर्स देण्यात आलेले आहेत. हा स्मार्टफोन चीनमध्ये २०९९ युऑन (अंदाजे २०,७२५ रूपये) मूल्यात ग्राहकांना सादर करण्यात आला आहे. लवकरच हे मॉडेल भारतीय बाजारपेठेत दाखल होऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here