सरफेस गो टॅबलेटची घोषणा : जाणून घ्या सर्व फिचर्स

0
मायक्रोसॉफ्ट सरफेस गो,microsoft surface go

मायक्रोसॉफ्टने सरफेस गो या नावाने नवीन टॅबलेट बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून या माध्यमातून आयपॅडला तगडे आव्हान उभे करण्याची तयारी केली आहे.

अ‍ॅपलच्या आयपॅड या मालिकेमध्ये अतिउच्च अर्थात प्रिमीयम ते बजेट म्हणजेच किफायतशीर दरातील विविध मॉडेल्स ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहेत. यामुळे प्रत्येक वर्गवारीतील ग्राहकाला आपापल्या आवडीनुसार हवे ते मॉडेल निवडता येते. या अनुषंगाने अ‍ॅपलवर सातत्याने मात करण्याच्या प्रयत्नात असणार्‍या मायक्रोसॉफ्ट कंपनीने सरफेस गो या मॉडेलच्या रूपाने एंट्री लेव्हल टॅबलेटच्या क्षेत्रात आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात सरफेसच्या मालिकेतील आधीच्या मॉडेल्सच्या तुलनेत यामध्ये प्राथमिक स्वरूपाचे फिचर्स देण्यात आले आहेत. याच्या विविध व्हेरियंटचे मूल्य ३९९ डॉलर्सपासून (सुमारे २७,६०० रूपये) सुरू होणारे आहे. पहिल्या टप्प्यात हे मॉडेल अमेरिका, ब्रिटन आणि अमेरिकेत लाँच करण्यात आले आहेत. लवकरच भारतातही याला सादर करण्यात येईल असे मानले जात आहे.

सरफेस गो टॅबलेटचे वैशिष्ट्य म्हणजे यात याच मालिकेतील प्रिमीयम मॉडेल्सप्रमाणेच अतिशय आकर्षक अशी डिझाईन प्रदान करण्यात आली आहे. यामध्ये स्टँडचा समावेश आहे. यात १० इंच आकारमानाचा व ३:२ अस्पेक्ट रेशो असणारा पिक्सलसेल या प्रकारातील डिस्प्ले देण्यात आला असून याचे रेझोल्युशन १८०० बाय १२०० पिक्सल्स इतके आहे. यामध्ये इंटेलचा सातव्या पिढीतील पेंटीयम गोल्ड ४४१५वाय हा प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम ४ व ८ जीबी असून इनबिल्ट स्टोअरेजसाठी ६४ आणि १२८ जीबी असे पर्याय आहेत. या दोन्ही व्हेरियंटमधील स्टोअरेज वाढविता येणार आहे. तर हे मॉडेल विंडोज १० या ऑपरेटींग सिस्टीमवर चालणारे असेल.

सरफेस गो या मॉडेलमध्ये अतिशय दर्जेदार बॅटरी देण्यात आली असून ती एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल ९ तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. यात युएसबी टाईप-सी पोर्टदेखील देण्यात आले आहे. तर सरफेस कनेक्टरच्या मदतीने हा टॅबलेट डेस्कटॉपला जोडण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे. यासोबत कंपनीने दर्जेदार किबोर्ड, माऊस, कव्हर सादर केले आहे. तर सरफेस पेनच्या मदतीने यावर कुणीही रेखाटन करू शकणार आहे.

टेकवार्ताविषयी

टेकवार्ता : आपल्या माय मराठी भाषेत तंत्रज्ञान अर्थात टेक्नॉलॉजी क्षेत्रातील सर्व घडामोडी येथे आपल्याला मिळतील. यात मराठी टेक न्यूज, गॅजेट न्यूज, सोशल मीडिया, स्मार्टफोन न्यूज, रिव्ह्यूज, व्हायरल न्यूज, ट्रेंड, टेक टिप्स, अ‍ॅप्स, गेम्स, मराठी टेक, मराठी टेक न्यूज आदींचा समावेश आहे.

Techvarta : Only tech news portal in marathi language. Marathi Technology News, Technews in marathi, gadgets news in marathi, smartphone news in marathi, social media news in marathi, viral news in marathi, trending news in marathi, reviews in marathi apps news in marathi, marathi tech news, marathi tech.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here