सचिन तेंडुलकर स्मार्टफोनवर घसघशीत सूट

0

सचिन तेंडुलकर स्मार्टफोन ( स्मार्टरॉन एसआरटी) या मॉडेलचे ३ जीबी रॅम व ३२ जीबी स्टोअरेज असणारे व्हेरियंट आता अवघ्या ७,५०० रूपयात ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

विक्रमादित्य सचिन तेंडुलकरच्या नावाने गेल्या मे महिन्यात स्मार्टरॉन कंपनीने स्मार्टरॉन एसआरटी या नावाने स्मार्टफोन लाँच केला होता. हे मॉडेल तीन जीबी रॅम ३२ जीबी स्टोअरेज आणि चार जीबी रॅम व ६४ जीबी स्टोअरेज अशा दोन पर्यायांमध्ये ग्राहकांना फ्लिपकार्टवरून अनुक्रमे १२,९९९ आणि १३,९९९ रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आले होते. यातील ३ जीबी रॅम व ३२ जीबी स्टोअरेज असणारे व्हेरियंट आता ग्राहकांना फक्त ७,५०० रूपये इतक्या मूल्यात खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.

सचिन तेंडुलकर स्मार्टफोन अर्थात स्मार्टरॉन एसआरटी या मॉडेलमध्ये पाच इंच आकारमानाचा आणि फुल एचडी डिस्प्ले तर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६५२ प्रोसेसर असेल. यात वर नमूद केल्यानुसार रॅम व स्टोअरेज असेल. तथापि, यात मायक्रो-एसडी कार्डची सुविधा नसल्यामुळे स्टोअरेज वाढविण्याची सुविधा मिळणार नाही. एलईडी फ्लॅशसह यातील मुख्य कॅमेरा १३ मेगापिक्सल्सचा तर सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. क्विकचार्ज २.० तंत्रज्ञानासह यात ३००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असेल. हे मॉडेल अँड्रॉईडच्या ७.१.१ नोगट आवृत्तीवर चालणारे आहे.

या मॉडेलमध्ये फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्ट असेल. अन्य फिचर्समध्ये वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, जीपीएस, युएसबी, युएसबी-ओटीजी, एफएम रेडिओ, ड्युअल मायक्रोफोन, बिल्ट इन स्पीकर, जीपीएस, एनएफसी, आदींचा समावेश आहे. तर यात गायरोस्कोप, अ‍ॅक्सलेरोमीटर, प्रॉक्झिमिटी सेन्सर, अँबिअंट लाईट, डिजीटल कंपास आदी सेन्सर्सही असतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here