संगणकाच्या लोकप्रियेतेला ओहोटी

0

संगणकाच्या उत्पादनात लागोपाठ घट असून याच्या लोकप्रियेतला ओहोटी लागल्याचे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे.

गार्टनर या रिसर्च फर्मच्या २०१८च्या पहिल्या तिमाहीतील संगणकाच्या विक्रीत घट झाल्याचे दिसून आले आहे. या अहवालानुसार जानेवारी ते मार्च २०१८ या तीन महिन्यांमध्ये जागतिक पातळीवर ६.१८ कोटी संगणकांची विक्री झाली. गत म्हणजेच २०१७च्या या कालखंडातील विक्रीपेक्षा हा आकडा १.४ टक्क्यांनी कमी आहे. तब्बल १४व्या तिमाहीत संगणक विक्रीत घट झाल्याचे यातून अधोरेखीत झाले आहे. २०१२च्या दुसर्या तिमाहीपासून (एप्रिल ते जून) आजवर संगणक विक्री सातत्याने कमी होत आहे. याला विद्यमान तिमाहीदेखील अपवाद नसल्याचे या अहवालाने अधोरेखीत केले आहे.

जागतिक पातळीवरील विचार करता चीनमध्ये गत तिमाहीत संगणक उत्पादनात तब्बल ५.७ टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून येत आहे. याचप्रमाणे आशिया, अमेरिका आदींमध्ये संगणक उत्पादनात घट आली आहे. अन्य भागांमध्ये संगणक उत्पादन वाढले असले तरी ते फार अल्प प्रमाणातील आहे. संगणक उत्पादनात एचपी, लेनोव्हो आणि डेल या कंपन्या अनुक्रमे पहिल्या, दुसर्या आणि तिसर्या क्रमांकावर असून या तिघांचा एकत्रीत वाटा तब्बल ५६.९ टक्के असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. गेल्या वर्षी हाच वाटा ५४.५ टक्के होता. विद्यमान तिमाहीत डेल कंपनीने जोरदार मुसंडी मारत ६.५ टक्क्यांची वृध्दी नोंदवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here