शाओमी रेडमी वाय१, वाय१ लाईटचा आज सेल

0

शाओमी कंपनीने आपल्या रेडमी वाय१ आणि वाय१ लाईट या दोन किफायतशीर दर्जाच्या स्मार्टफोनचा आज अमेझॉन इंडियावरून सेल होणार आहे.

भारतीय ग्राहकांसाठी शाओमी कंपनीने रेडमी वाय१ आणि रेडमी वाय१ लाईट हे दोन स्मार्टफोन्स नोव्हेंबर महिन्यात सादर केले होते. याला अतिशय उत्तम प्रतिसादही लाभला होता. या पार्श्‍वभूमिवर आज दुपारी १२ वाजता अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून याच्या सर्व व्हेरियंटचा फ्लॅश सेल होणार आहे. याचे मूल्य आणि अन्य ऑफर्स हे आधीनुसारच असतील.

शाओमी रेडमी वाय १ या मॉडेलमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि एचडी क्षमतेचा (१२८० बाय ७२० पिक्सल्स) डिस्प्ले असून यावर कॉर्निंग गोरीला ग्लासचे संरक्षक आवरण आहे. ६४ बीट ऑक्टॉ-कोई क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४३५ प्रोसेसरने सज्ज असणार्‍या या मॉडेलचे ३ जीबी रॅम/३२ जीबी स्टोअरेज आणि ४ जीबी रॅम.६४ जीबी स्टोअरेज असे दोन व्हेरियंट असून या दोन्हींचे स्टोअरेज मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. यात सेल्फी लाईटसह १६ मेगापिक्सल्सचा फ्रंट तर १३ मेगापिक्सल्सचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तर यातील बॅटरी ३०८० मिलीअँपिअर क्षमतेची असेल. याच्या दोन्ही व्हेरियंटचे मूल्य अनुक्रमे ८,९९९ आणि १०,९९९ रूपये आहे.

शाओमी रेडमी वाय १ लाईट या मॉडेलमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४२५ प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम दोन जीबी आणि स्टोअरेज १६ जीबी असेल. तर यातील सेल्फी कॅमेरा ५ मेगापिक्सल्स क्षमतेचा तर रिअर कॅमेरा १३ मेगापिक्सल्सचा असेल. तर यातील उर्वरित फिचर्स हे रेडमी वाय १ या मॉडेलप्रमाणेच असेल. याचे मूल्य ६,९९९ रूपये असून हे दोन्ही स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट आवृत्तीवर आधारित एमआययुआर ८ वर चालणारे असतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here