शाओमी मी ए२चे दोन व्हेरियंट भारतात लाँच

0
शाओमी मी ए२, मी ए२ लाईट, xiaomi mi a2, mi a2 lite

शाओमी कंपनीने आपल्या मी ए२ या स्मार्टफोनला दोन व्हेरियंटमध्ये भारतीय बाजारपेठेत लाँच करण्याची घोषणा केली असून याला अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे.

शाओमी कंपनीने अलीकडेच मी ए२ आणि मी ए२ लाईट या दोन मॉडेल्सला जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली होती. यांचे अनावरणदेखील करण्यात आले होते. यातील मी ए२ हा स्मार्टफोन आज अधिकृतपणे भारतीय ग्राहकांसाठी लाँच करण्यात आला आहे. याला ४ जीबी आणि ६ जीबी रॅम या दोन पर्यायांमध्ये ग्राहकांना उपलब्ध करण्यात आलेले आहे. यातील ४ जीबी रॅमचे व्हेरियंट १६,९९९ रूपये मूल्यात मिळणार असून दुसर्‍या व्हेरियंटचे मूल्य मात्र जाहीर करण्यात आलेले नाही. अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून याला ९ ऑगस्टपासून खरेदी करता येणार आहे.

शाओमी मी ए२ या मॉडेलमध्ये ५.९९ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस (२१६० बाय १०८० पिक्सल्स) क्षमतेचा आणि १८:९ अस्पेक्ट रेशो असणारा डिस्प्ले देण्यात आला आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ६६० हा प्रोसेसर असेल. वर नमूद केल्यानुसार याला ४ जीबी रॅम/६४ जीबी स्टोअरेज आणि ६ जीबी रॅम/१२८ जीबी स्टोअरेज अशा दोन पयार्यांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. या दोन्ही व्हेरियंटचे स्टोअरेज वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. हे दोन्ही मॉडेल्स ब्ल्यू, ब्लॅक आणि गोल्ड अशा रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहेत. मी ए२ या मॉडेलच्या मागील बाजूस २० आणि १२ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. तर यात २० मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. तसेच यामध्ये क्विकचार्ज ३.० प्रणालीचा सपोर्ट असणारी ३,०१० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here