शाओमी मी ए१ बाजारपेठेतून होणार आऊट

0

शाओमी कंपनीने आपल्या मी ए१ या स्मार्टफोनचे उत्पादन थांबवले असून लवकरच हे मॉडेल डिसकंटीन्यू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

शाओमी कंपनीने गेल्या सप्टेबर महिन्यात मी ए१ हा स्मार्टफोन १४,९९९ रूपये मूल्यात भारतीय ग्राहकांना सादर केला होता. डिसेंबर महिन्यात याच्या मूल्यात एक हजार रूपयांची कपात करण्यात आल्याने हे मॉडेल १३,९९९ रूपयात ग्राहकांना खरेदी करता येत होते. अद्यापही हे मॉडेल मर्यादीत प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र शाओमी कंपनीने याचे उत्पादन थांबविले असून डीलर्सला याचा पुरवठा करण्यात येत नसल्याची माहिती समोर आली आहे. अर्थात, लवकरच हा स्मार्टफोन बाजारपेठेतून काढून घेण्यात येणार असल्याचे संकेत यातून मिळाल्याचे मानले जात आहे. वास्तविक पाहता शाओमी मी ए१ या मॉडेलला बाजारपेठेत बर्‍यापैकी प्रतिसाद लाभला असतांना याला डिसकंटीन्यू करण्याचे कारण कळले नाही. तथापि, शाओमी कंपनी लवकरच मीए२ हे मॉडेल भारतीय ग्राहकांसाठी सादर करणार असून याचसाठी मी ए१चे उत्पादन थांबविण्यात आल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे.

शाओमी मी ए १ या स्मार्टफोनमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि १०८० बाय १९२० पिक्सल्स म्हणजेच फुल एचडी क्षमतेचा डिस्प्ले असेल. याची रॅम चार जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते ३०० जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे.शाओमी मी ए १ हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे आहे. याया मागील बाजूस १२ मेगापिक्सल्सचे दोन कॅमेरे आहेत. तर यातील फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा आहे. शाओमी मी ए२ या मॉडेलमध्ये यापेक्षा सरस फिचर्स असण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here