शाओमीचा स्वतंत्र मी व्हीआर हेडसेट

0

शाओमी कंपनीने स्टँडअलोन या प्रकारातील मी व्हीआर हेडसेट बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

शाओमी कंपनीने आपल्या नुकत्याच झालेल्या ग्लोबल लाँच कार्यक्रमात मी व्हीआर हेडसेटचे अनावरण केले. हा स्टँडअलोन म्हणजेच स्वतंत्र या प्रकारातील व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी हेडसेट असेल. अर्थात यामध्ये डिस्प्ले देण्यात आला असून आभासी सत्यतेचा आनंद घेण्यासाठी यात स्मार्टफोन इनसर्ट करण्याची आवश्यकता नाही. फेसबुकची मालकी असणार्‍या ऑक्युलसच्या मदतीने मी व्हीआर हेडसेट बाजारपेठेत उतारण्यात आला आहे. यामध्ये १४४० बाय २५६० पिक्सल्स क्षमतेचा अतिशय दर्जेदार डिस्प्ले देण्यात आलेला आहे. यात क्वॉलकॉमचा अतिशय गतीमान असा स्नॅपड्रॅगन ८२१ प्रोसेसर दिलेला असून याची रॅम ३ जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ३२/६४ जीबी इतके आहे. यामुळे यात कुणीही युजर आपल्याला हवे असणारे कंटेंट सेव्ह करू शकतो. यामध्ये ३डीओएफ अर्थात २ डिग्री ऑफ फ्रिडम हे फिचर प्रदान करण्यात आले आहे. तर यात डिस्टन्स आणि इनर्शियल सेन्सर्सदेखील देण्यात आले आहेत. यामध्ये ऑक्युलसवरील सुमारे १० गेम्सचा मोफत आनंद घेता येणार आहे. तर अतिशय उत्तम दर्जाच्या अनुभूतीसाठी यात दर्जेदार साऊंड सिस्टीम देण्यात आली आहे. यामध्ये वाय-फाय कनेक्टीव्हीटी देण्यात आलेली आहे. मी व्हीआर हेडसेटला पहिल्यांदा चीनी बाजारपेठेत उतारण्यात आले आहे. मात्र लवकरच हा हेडसेट भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात येईल असे मानले जात आहे. भारतातील याचे मूल्य १५ हजारांच्या आसपास राहू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here