शाओमीचा मी एलईडी स्मार्ट टिव्ही ४ दाखल

0

शाओमी कंपनीने भारतीय बाजारपेठेत मी एलईडी स्मार्ट टिव्ही ४ हे मॉडेल सादर करण्याची घोषणा केली आहे.

शाओमीचा हा स्मार्ट एलईडी टिव्ही ५५ इंच आकारमानाचा असून ग्राहकांना ३९,९९९ रूपयात ग्राहकांना उपलब्ध केला आहे. यामध्ये ४-के क्षमतेचा सॅमसंग कंपनीने तयार केलेला डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यावर कुणीही१७८ अंशाच्या व्ह्यूइंग अँगलसह २१६० बाय ३८४० पिक्सल्स क्षमतेचे अतिशय सुस्पष्ट आणि एचडीआर म्हणजेच हाय डायनॅमीक रेंज या तंत्रज्ञानाने सज्ज असणारे चित्र पाहू शकतो. विशेष बाब म्हणजे हा स्मार्ट टिव्ही अवघ्या ४.९ मीलीमीटर जाडीचा अर्थात एखाद्या स्मार्टफोनपेक्षाही स्लीम आहे. हा जगातील सर्वात स्लीम स्मार्ट टिव्ही असल्याचा शाओमीचा दावा आहे. यात डॉल्बी ऑडिओ आणि डीटीएस प्रणालीसह दोन स्पीकर देण्यात आले आहेत. तर हा सुपर स्लीम स्मार्ट टिव्ही विविध डीटीएच व केबल कंपन्यांच्या सेट टॉप बॉक्सलाही संलग्न करता येतो. यात कोर्टेक्सचा क्वॉड-कोअर ए-५३ प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ८ जीबी इतके आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, एचडीएमआय, युएसबी, इथरनेट आणि एव्ही पोर्ट आदी सुविधा आहेत. हा स्मार्ट टिव्ही अँड्रॉइड प्रणालीवर चालणारा असून यावर गुगल प्ले स्टोअरवरील विविध अ‍ॅप्स वापरता येतील. यात शाओमीची पॅचवॉल प्रणाली देण्यात आली असून या कृत्रीम बुध्दीमत्तेने युक्त प्रणालीच्या मदतीने युजरच्या आवड-निवडीशी संबंधीत कंटेंट त्याला सुचविण्यात येते. यात १५ भारतीय भाषांचा सपोर्टदेखील देण्यात आला आहे. ग्राहकांना हे मॉडेल शाओमी कंपनीच्या मी.कॉम आणि फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here