शाओमीचा पहिला गेमिंग लॅपटॉप

0

शाओमीने मी गेमिंग लॅपटॉप हा पहिला गेमिंग लॅपटॉप सादर करण्याची घोषणा केली आहे.

शाओमीच्या मी गेमिंग लॅपटॉपमध्ये १५.६ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी म्हणजे १९२० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले दिलेला आहे. यात १७८ अंशाचा व्ह्यू अँगल प्रदान करण्यात आला आहे. यात सातव्या पिढीतील इंटेलचे कोअर आय ५ आणि आय ७ या प्रोसेसरचे पर्याय देण्यात आले आहेत. याला ६ जीबी डीडीआर ५ एनव्हिडीया जीफोर्स जीटीएक्स २०६० या ग्राफीक प्रोसेसरची जोड देण्यात आली आहे. यात ८ व १६ जीबी रॅमचे पर्याय आहेत. तर स्टोअरेजसाठी २५६ जीबी, ५१२ जीबी आणि १ टेराबाईट असे पर्याय दिलेले आहेत. यामध्ये खास गेमर्सच्या सुविधेसाठी विकसित करण्यात आलेला कि-बोर्ड प्रदान करण्यात आला आहे. यावर गेमिंगमध्ये महत्वाच्या मानल्या जाणार्या पाच बाबींसाठी स्वतंत्र की देण्यात आल्या आहेत. यामुळे अर्थातच गेमर्सला सुविधा मिळणार आहे.

शाओमीच्या मी गेमिंग लॅपटॉपमध्ये एचडीएमआय पोर्ट, युएसबी ३.० पोर्ट, युएसबी टाईप-सी पोर्ट, इथरनेट पोर्ट, एसडी/एसडीएचसी/एसडीएक्ससी असे ३-इन-१ कार्ड रीडर, वाय-फाय आणि ब्ल्यु-टुथ आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. यात डॉल्बी अ‍ॅटमॉस ही अतिशय उच्च दर्जाची ध्वनी प्रणाली दिलेली आहे. हा गेमिंग लॅपटॉप विंडोज १० या प्रणालीवर चालणारा असून यात ५५ वॅट प्रति-तास क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. पहिल्यांदा हा लॅपटॉप चीनमध्ये मिळणार असून हे मॉडेल लवकरच भारतात मिळू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here