व्ह्यूसोनिकचे फोर-के प्रोजेक्टर

0

व्ह्यूसोनिक कंपनीने भारतीय बाजारपेठेत फोर-के रेझोल्युशन क्षमतेचे व्ह्यूसोनिक पीएक्स७४७ फोर-के हे प्रोजेक्टर सादर करण्याची घोषणा केली आहे.

अलीकडच्या कालखंडात फोर-के प्रक्षेपणास सक्षम असणारे प्रोजेक्टर लोकप्रिय होत आहेत. या पार्श्‍वभूमिवर, व्ह्यूसोनिक कंपनीने नेमक्या याच प्रकारातील मॉडेल भारतीय बाजारपेठेत उतारले आहे. व्ह्यूसोनिक पीएक्स७४७ फोर-के हा प्रोजेक्टर ग्राहकांना २,७५,००० रूपये मूल्यात खरेदी करता येणार आहे. फोर-के या प्रकारात फुल एचडीपेक्षा तब्बल चार पटीने सुस्पष्ट असणारे चलचित्र पाहता येते. दरम्यान, व्ह्यूसोनिक कंपनीचे हे मॉडेल जगात सर्वाधीक ब्राईटनेस असणारे प्रोजेक्टर असल्याचा कंपनीचा दावा आहे. यात अतिशय दर्जेदार असे ३५०० ल्युमेन्स क्षमतेचे लाईट प्रदान करण्यात आले असून याची तब्बल १५ हजार तासांची कंपनीने वॉरंटी दिली आहे. यात एचडीआरचा सपोर्ट असल्यामुळे सजीव चलचित्रांचा अनुभव घेता येणार आहे. कनेक्टीव्हिटीसाठी यात ड्युअल एचडीएमआय पोर्ट प्रदान करण्यात आले आहे. तर युएसबी पोर्टच्या माध्यमातून याला गुगल क्रोमकास्टसह अन्य टिव्ही स्टीक्स संलग्न करता येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here