व्होल्टाजचा अलेक्झा असिस्टंटयुक्त स्मार्ट एसी

0
व्होल्टाज स्मार्ट एसी, voltas smart ac

व्होल्टाज कंपनीने अमेझॉनचा अलेक्झा हा डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंटचा सपोर्ट असणारे दोन स्मार्ट एसी भारतीय बाजारपेठेत लाँच केले आहेत.

जगातील सर्व उपकरणे स्मार्ट होत असतांना आता एयर कंडिशनरदेखील स्मार्ट होऊ लागल्याची चुणूक आता दिसून येत आहे. या अनुषंगाने व्होल्टाज कंपनीने आता इन्व्हर्टर सुपर स्प्लीट एसी आणि इन्व्हर्टर स्प्लीट एसी या नावाने हे दोन नवीन मॉडेल बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे यात अमेझॉनचा अलेक्झा हा डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंट प्रदान करण्यात आला आहे. म्हणजे याच्या मदतीने व्हाईस कमांड म्हणजे ध्वनी आज्ञावलीचा वापर करून कुणीही या एसीच्या विविध फंक्शन्सचा वापर करू शकतो. यामध्ये एसी चालू-बंद करण्यासाठी तापमान कमी-जास्त करणे अथवा विविध मोडस् बदलणे आदींचा समावेश आहे. याशिवाय, युजर त्याला हव्या असणार्‍या तापमानाला याच्या माध्यमातून सेट करू शकतो.

अलेक्झा अ‍ॅप तसेच इको या मालिकेतील स्मार्ट स्पीकर्सच्या मदतीने हे फंक्शन्स पार पाडता येणार आहेत. अलेक्झाच्या अँड्रॉइड व आयओएस या दोन्ही प्रणालींसाठीच्या असणार्‍या अ‍ॅपच्या मदतीने याचा वापर करता येणार असल्याचे व्होल्टाज कंपनीने नमूद केले आहे. हे दोन्ही स्मार्ट एसी अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here