व्होडाफोन व आयडियाचा होणार विलय

0

व्होडाफोन आणि आयडिया कंपन्यांचा विलय होणार असून यातून नवीन नावाने सेल्युलर सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून व्होडाफोन आणि आयडिया कंपन्यांच्या विलयाची चर्चा सुरू होती. यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. याबाबत दोन्ही कंपन्यांतर्फे कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे वृत्त आहे. सद्यस्थितीत भारतीय बाजारपेठेत भारती एयरटेल कंपनी पहिल्या क्रमांकावर तर रिलायन्स जिओ दुसर्‍या क्रमांकावर विराजमान आहे. मात्र व्होडाफोन आणि आयडिया कंपन्यांच्या एकत्रीकरणानंतर यातून आकारात आलेली कंपनी ही देशातील पहिल्या क्रमांकाची सेल्युलर कंपनी बनणार आहे. व्होडाफोन कंपनीला शहरी तर आयडियाला ग्रामीण भागात चांगली लोकप्रियता लाभलेली आहे. या पार्श्‍वभूमिवर, या दोन्ही कंपन्या एकत्रीतपणे भारतीय सेल्युलर क्षेत्रात धमाल करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या एकत्रीकरणाची प्रक्रिया सुरू झाली असून याबाबत येत्या काही महिन्यांमध्ये अधिकृत घोेषणा होऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here