व्होडाफोन आणि टेक्नोचा सहकार्याचा करार

0
Vodafone,व्होडाफोनचा प्लॅन,व्होडाफोन

व्होडाफोन कंपनीने ट्रान्सशियन इंडियाची मालकी असणार्‍या टेक्नो मोबाईल्ससोबत सहकार्याचा करार केला आहे. याच्या अंतर्गत आता टेक्नोच्या मॉडेल्ससोबत कॅशबॅकसह अनेक सवलती देण्यात येत आहेत.

व्होडाफोन इंडियाने नामांकीत स्मार्टफोन ब्रँड ट्रान्सशियन इंडियासोबत भागीदारीची घोषणा केली. नवीन ४ जी कॅमोनी सिरीज हँडसेट खरेदी करणार्‍याला रु. २२०० पर्यंतचा कॅशबॅक मिळेल. त्याशिवाय व्होडाफोन प्लेच्या दर्जेदार विडीयो कंटेंटचा तीन महिन्यांपर्यंत मोफत अमर्याद लाभ मिळवता येईल. ही विशेष ऑफर १४ मार्च ते ३० जून २०१८ पर्यंत वैध राहणार आहे. याच्या अंतर्गत व्होडाफोनच्या सध्याच्या आणि नवीन प्रीपेड ग्राहकांना १८ महिन्यांकरिता प्रती महिना रु १५० चे साधे रिचार्ज केल्यास रु. ९०० चा कॅशबॅक मिळेल. पुढील १८ महिन्यांसाठी रु. १५० चा रिचार्ज केल्यास ग्राहकांना रु. १३०० चा कॅशबॅक म्हणजे एकूण रु. २,२०० चा कॅशबॅक मिळणार आहे. हा कॅशबॅक वोडाफोनच्या एम-पैसा वॉलेटमध्ये जमा होईल.

या व्यतिरिक्त ३ महिन्यांसाठी ‘व्होडाफोन प्ले’चे पूर्णपणे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. वोडाफोन प्ले हे एक व्हिडियो स्ट्रीमिंग अ‍ॅप आहे. ज्यामध्ये प्रेक्षकांना १० हजारांपेक्षा सिनेमे, ३०० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनल्स, ५० पेक्षा जास्त दर्जेदार आंतरराष्ट्रीय टीव्ही कार्यक्रम, १६ अस्सल मोबाईल वेब सिरीज आणि शेकडो मनोरंजक शॉर्ट विडीयो सोबत सर्व प्रकारातील ट्रेंडिंग व्हिडियो आणि म्युझिक कंटेटचा समावेश आहे. वोडाफोनची कॅशबॅक ऑफर ही टेक्नोच्या आय३, आय३ प्रो, आय५, आय ५ प्रो आणि आय ७ आय सिरीज हँडसेटसोबत उपलब्ध आहे. या उपकरणांच्या किंमती रु. ६,९९० ते रु. १४,९९० अशा ठेवण्यात आलेल्या आहेत. शँपेन गोल्ड, स्काय ब्लॅक आणि स्पेस ग्रे अशा मनमोहक रंगांमध्ये हे स्मार्टफोन्स उपलब्ध असतील. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना कोणतेही वॉईस टॉप अप किंवा डेटा रिचार्ज, किंवा कोणतेही मासिक अथवा नियमित अमर्याद पॅक प्रती महिना रु १५० मध्ये विकत घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here