व्होडाफोनचे दोन हाय डाटा प्लॅन जाहीर

0
Vodafone,व्होडाफोनचा प्लॅन,व्होडाफोन

व्होडाफोनने अपल्या ग्राहकांसाठी दोन नवीन हाय डाटा प्लॅन जाहीर केले असून देशातील सर्व सर्कलमध्ये याला लागू करण्यात आले आहे.

सेल्युलर कंपन्यांमध्ये ग्राहकांना आकर्षीत करण्याची स्पर्धा अतिशय तीव्र झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे ग्राहकांना अतिशय किफायतशीर मूल्यातील प्लॅन सादर करण्यात येत आहेत. तथापि, काही ग्राहकांना दररोज विपुल डाटा लागत असतो. यामुळे एकीकडे एंड युजरला स्वस्त प्लॅन सादर करतांना दुसरीकडे या ग्राहकांची गरज लक्षात घेऊनही उच्च श्रेणीतील प्लॅन्स उपलब्ध करण्यात येत आहेत. या अनुषंगाने व्होडाफोन कंपनीने याच युजर्सला डोळ्यासमोर ठेवून दोन नवीन प्लॅन सादर करण्याची घोषणा केली आहे.

व्होडाफोनचे हे दोन्ही प्लॅन्स अनुक्रमे ५४९ आणि ७९९ रूपये मूल्याचे असून याची वैधता २८ दिवसांची असणार आहे. याच्या अंतर्गत पहिल्या प्लॅनमध्ये दररोज ३.५ तर दुसर्‍यात ४.५ जीबी थ्रीजी/फोरजी डाटा वापरता येणार आहे. अर्थात ५४९ रूपयांमध्ये ग्राहकांना ९८ जीबी डाटा वापरता येणार आहे. तर ७९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकाला एकूण १२६ जीबी डाटा उपलब्ध करण्यात येणार आहे. दोन्हींमध्ये अमर्यात मोफत स्थानिक आणि एसटीडी कॉलींग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधादेखील देण्यात येणार आहे. या दोन्ही प्लॅनच्या युजर्सला व्होडाफोन प्ले अ‍ॅपवरील व्हिडीओ कंटेंट मोफत पाहता येणार आहे. तसेच त्याला मोफत लाईव्ह टिव्हीची सुविधादेखील देण्यात येणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. जिओने आधीच दररोज ४ आणि ५ जीबी डाटा प्रदान करणारे प्लॅन ५०९ आणि ७९९ रूपयांमध्ये उपलब्ध केले आहेत. व्होडाफोन या माध्यमातून जिओला आव्हान देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here